भाकरी आणि ठेचा हे मराठी खाद्यसंस्कृतीची ओळख आहे. अनेकदा चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टर भाकरी खाण्याचा सल्ला देतात. भाकरी पचायला पण हलकी असते. भाकरी बनवताना अनेकांना टेन्शन येतं की भाकरी छान लुसलुशीत होईल का? पण आज आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरुन तुम्ही परफेक्ट मऊ आणि लुसलुशीत भाकरी बनवू शकता.
- सुरुवातीला भाकरीचे पीठ चांगले मळून घ्यावे. पीठ चांगले मळले असेल तर भाकरी चांगली थापली जाते आणि थापताना तुटत नाही.
- भाकरीचे पाणी भिजवताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. त्यामुळे पीठ चांगले एकजीव होते आणि भाकरी नीट थापली जाते.
हेही वाचा : Masale Bhaat Recipe : महाप्रसादासारखा टेस्टी मसालेभात कसा बनवायचा? नोट करा ही सोपी रेसिपी
- भाकरी थापणे, प्रत्येकाला जमत नाही. अनेकदा थापताना भाकरी तुटते अशावेळी ज्या लोकांना भाकरी थापणे जमत नाही त्या लोकांनी भाकरी लाटून घ्यावी.
- मंद आचेवर तवा ठेवावा आणि गरम तव्यावर भाकरी भाजावी. त्यानंतर थेट मंद आचेवर भाकरी दोन्ही बाजून भाजून घ्यावी.