how to make soft chapati : पोळी हा आपल्या दररोजच्या आहारातील अविभाज्य घटक आहे. दुपारचे जेवण असो की रात्रीचे पोळी ही आपल्याला जेवणात हवीच असते पण दररोज बनविणाऱ्या कधी कधी पोळ्या कडक होतात. अशा वेळी अनेकदा गव्हाच्या पिठ चांगले नाही म्हणून कारण सांगतो. पण तुम्हाला माहिती आहे का काही टिप्सचा वापर करुन तुम्ही मऊ अन् लुसलुशीत पोळ्या बनवू शकता. त्या टिप्स कोणत्या, चला तर जाणून घेऊ या.
हेही वाचा : Wheat Biscuits : गव्हाच्या पीठापासून बनवा पौष्टिक खुसखुशीत बिस्किटे, रेसिपी नोट करा
- गव्हाचे पीठ भिजवताना जास्त पाणी टाकू नये
- कणिक मऊ होईलपर्यंत चांगली मळून घ्यावी.
- कणीक मळून झाल्यानंतर दहा मिनिटे झाकून ठेवा.
- त्यानंतर कणकेचा एकसारखा गोळा करा.
- पोळी व्यवस्थीत लाटा.
- तवा गरम झाल्यानंतर तव्यावर पोळी टाका.
हेही वाचा : Kanda Bhaji : कांदा भजी कुरकुरीत करण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स, लिहून घ्या ही रेसिपी…
- पोळी एका पद्धतीने भाजा. एका बाजूची पोळी व्यवस्थीत भाजल्यानंतरच मगच पोळीची बाजू बदलवा.
- अनेकजण पोळीची बाजू पलटण्याची घाई करतात.
- तेलाची पोळी करताना तव्यावर पोळीला दोन्ही बाजून तेल लावून घ्या.
- पोळीच्या कडा चांगल्या भाजा अनेकदा कडा कच्च्या राहतात.
- पोळी भाजल्यानंतर लगेच डब्यात ठेवू नका. थोड्या वेळाने पोळ्या डब्यात ठेवा