Jowar Bhakri : नेहमी नेहमी पोळी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही ज्वारीची भाकरी करू शकता. काही लोकांना ज्वारीची भाकरी बनवता येत नाही आणि ज्यांना बनवता येते त्यांना मऊ लुसलुशीत भाकरी बनवता येत नाही पण आज आम्ही तुम्हाला लुसलुशीत ज्वारीची भाकरी बनवण्याची एक हटके पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या रेसिपी
साहित्य :
- ज्वारीचे पीठ
- गरम पाणी
- लोणी किंवा तूप
- मीठ
हेही वाचा : Spicy Flower : चटपटीत आणि मसालेदार खायची इच्छा होतेय? मग, स्पायसी फ्लॉवर खाऊन पाहा, नोट करा ही हटके रेसिपी
कृती :
- पातेल्यात पाणी गरम करा त्यात १ चम्मच लोणी टाका
- पाणी चांगले गरम झाले की त्यात ज्वारीचे पीठ आणि मीठ घाला आणि मिक्स करा.
- थोडेथोडे पाणी ओतावे. हळू हळू पीठ मळावे. पीठ चांगले मळावे.
- मळलेल्या पिठाचे ४ किंवा ५ गोळे करावे व लगेच भाकरी करण्यास घ्यावी.
- तवा गरम झाला कि गॅस मीडियम आचेवर ठेवावा. मळलेल्या पिठाचा गोळा कोरड्या पीठात बुडवून हलक्या हाताने लाटावा किंवा किंवा थापावी.
- भाकरी तव्यावर टाकावी. वरच्या बाजूने हाताने किंवा सुती कापडाने पाणी लावावे.
- त्यानंतर भाकरी पलटावी व दुसर्या बाजूने भाजावी.
- गरमागरम भाकरीवर लोणी टाकावे आणि झुणका, पिठलं बरोबर खावे.