How To Make Soya Cutlet Recipe In Marathi : अनेक शाकाहारी खाणारी माणसं सोयाबीनची भाजी आवडीने खातात. अलीकडे सोयाबीनपासून विविध पदार्थ बनवले जातात आणि ते मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात. ज्यात सोया सॉस, मोड आलेले सोयाबीन, सोयाबीन दूध, आटा आदींचा समावेश असतो. सोयाबीन पासून बनवलेले पदार्थ आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. तर आज सोशल मीडियावर एका युजरने सोयाबीनपासून कटलेट (How To Make Soya Cutlet ) बनवले आहेत, जे तुम्ही लहान मुलांच्या डब्यात किंवा सकाळ, संध्याकाळी नाश्त्यासाठी देखील बनवू शकता.

साहित्य (Soya Cutlet Recipe Ingredients) :

एक कप सोयाबीन

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

१/४ कप गाजर

१/४ कप सिमला मिरची

१/४ कप कांदा

१/४ कप बीट

१/२ चमचा चिरलेला लसूण, आलं

१ चमचा मीरपूड

१ चमचा मिरची पावडर

१/२ चमचा गरम मसाला

१ चमचा जिरा पावडर

१ चमचा धने पावडर

१/२ कप बेसन

१/४ कप रवा

१/४ कप पनीर

कोथिंबीर चवीनुसार

चवीनुसार मीठ

हेही वाचा…Home Made Maggy: चटपटीत नाश्त्यासाठी बनवा गव्हाच्या पिठापासून मॅगी; लहान मुलं होतील खूश

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Soya Cutlet ) :

सगळ्यात पहिला सोयाबीन २ ते ३ वेळा धुवून घ्या.

त्यानंतर पाण्यात मीठ घालून ५ मिनिटे उकळवा. लगेच थंड पाण्यात घाला.

पाणी पिळून मिक्सरच्या भांड्यात घाला आणि स्मॅश करून घ्या.

स्मॅश करून घेतलेल्या मिश्रणात उकडलेलं बीट, गाजर तर सिमला मिरची, कांदा, चिरलेला लसूण, आलं, मीठ, मीरपूड, गरम मसाला, मिरची पावडर, जिरा पावडर, धने पावडर, कोथिंबीर, बेसन, रवा, पनीर घाला आणि मिश्रणाचा एक गोळा तयार करा.

त्यानंतर मिश्रणाचे छोटे-छोटे कटलेट बनवून घ्या.

नंतर पॅनमध्ये तेल घ्या आणि कटलेट शॅलो फ्राय करून घ्या.

अशाप्रकारे तुमचे सोयबीन कटलेट तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chieffoodieofficer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोयाबीनपासून मिळत असलेल्या प्रथिनांमुळे (प्रोटिनमुळे) आपल्या हाडांना भरपूर कॅल्शियम मिळते. त्याचबरोबर यामध्ये असलेल्या इसोफ्लेवोन्स या घटकामुळे हाडांना पोहोचणार्‍या इजांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऑस्टियोरोसिसच्या धोक्यापासून दूर राहण्यास मदत मिळते. त्यामुळे सोयाबीनचा आहारात समावेश करणे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरू शकते.

Story img Loader