कोशिंबीर म्हणजे आपण काकडी किंवा टोमॅटोमध्ये थोडे दही घालून करतो. अशाच प्रकारची कोशिंबीर करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मात्र तुम्ही कधी बांगड्याची कोशिंबीर खाल्ली आहे का? होय, सुक्या बांगड्याची देखील कोशिंबीर करता येते. ही बनवायला अगदी सोप्पी आणि चवीला अप्रतिम असते. तुम्ही अगदी कमी सामानात ही कोशिंबीर घरच्या घरी तयार करू शकता. मासे खायला अनेकांना आवडतात. जर तुम्हालाही मासे आवडत असतील तर ही भन्नाट रेसिपी एकदा जाणून घ्याच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य

  • ४ ते ५ सुके बांगडे
  • ३ ते ४ कांदे
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा आमचूर पावडर
  • तेल
  • कोथंबीर

( हे ही वाचा: ओल्या जवळ्याची कुरकुरीत भजी कधी खाल्लीये का? नसेल तर आजचं घरी बनवा, पाहा रेसिपी)

कृती

  • सुके बांगडे स्वच्छ करून बारीक तुकडे करून घ्या.
  • तव्यावर तेल टाकून बारीक चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या हळद टाकून परतवून घ्या.
  • त्यानंतर त्यात सुक्या बांगड्याचे तुकडे, मीठ आणि आमचूर पावडर टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • यानंतर कोथिंबीर घालून कोशिंबीर तयार करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make spicy dried bangada salad koshimbir know easy recipe gps