Spicy Flower : फ्लॉवरची भाजी आपण नेहमी करतो पण नेहमी नेहमी तीच फ्लॉवरची भाजी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही फ्लॉवरचा नवा प्रकार ट्राय करू शकता. स्पायसी फ्लॉवर ही टेस्टी डिश तुम्ही करू शकता. स्पायसी फ्लॉवर बनवायला खूप सोपी आहे. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

फ्लॉवरचे तुकडे
पालकाची पाने
कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
हळद पावडर
आल्याचे तुकडे
कलौंजी
लसणीच्या पाकळ्या
रिफाइंड ऑइल
मीठ

हेही वाचा : Shahi Flower Recipe : हॉटेलसारखं शाही फ्लॉवर आता घरीच बनवा, पाहा ही सोपी रेसिपी

कृती

फ्लॉवरचे तुकडे उकळत्या पाण्यात टाका.
दोन मिनिटानंतर पाण्यातून बाहेर काढा.
१ चमचा तेलात हळद टाकून परतून घ्या.
त्यात कोथिंबीर, पालक, हिरवी मिरची, लसूण आणि आले एकत्र करून जाडसर वाटा.
तेल गरम करून हिरवा मसाला परतून घ्या.
त्यात फ्लॉवरचे तुकडे टाका
मसाला चांगल्याप्रकारे फ्लॉवरला लागला का, हे तपासा.
स्पायसी फ्लॉवर तयार आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make spicy flower recipe masala kobi bhaji food lovers food news ndj