महाराष्ट्रातील विविध भागात, एकच पदार्थ कितीतरी वेगवेळ्या पद्धतींनी बनवला जातो. त्यापैकी आज आपण घरात खानदेशी पद्धतीने मटण करी कशी बनवायची ते पाहूया. रोजच्या साध्या जेवणातून तुम्हाला सुट्टीच्या दिवशी जर कधी चमचमीत आणि झणझणीत असे काही खावेसे ववाटले, तर ही रेसिपी नक्की करून पाहा.
सोशल मीडियावर @natashaagandhi या इन्स्टाग्राम अकाउंटने या खानदेशी मटण करीची रेसिपी शेअर केली आहे. त्याप्रमाणे हा पदार्थ बनवण्यासाठी काय सामग्री लागणार आहे ते पहा. तसेच याची कृतीदेखील लिहून ठेवा.
खानदेशी पद्धतीने मटण करीकशी बनवावी पाहा
साहित्य
- मटण
- कांदा
- खोबरे
- हिरवी मिरची
- लसूण
- आले
- कोथिंबीर
- दही
- लवंग
- मीठ
- हळद
- तिखट
- गरम मसाला/ काळा मसाला
- लिंबू
हेही वाचा : Kitchen tips : स्वयंपाक घरातील मच्छीचा वास कसा घालवावा? पाहा या ४ सोप्या टिप्स
कृती
मटण शिजवण्याआधी त्यासाठी पूर्वतयारी करून घ्या.
- सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात १/४ कप कोथिंबीर, चार ते पाच हिरव्या मिरच्या, १५-२० लसणीच्या पाकळ्या आणि आले किंवा आल्याची पेस्ट घालून सर्व घटक वाटून घ्या. मटणाला लावण्यासाठी हिरवे वाटण तयार आहे.
- आता एका परातीत किंवा बाऊलमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले, १.५ किलो मटण घ्या.
- या मटणाला १ चमचा मीठ, १ चमचा हळद, १ कप दही आणि तयार केलेले हिरवे वाटण व्यवस्थित लावून घ्या.
मटणाच्या ग्रेव्हीची तयारी
- गॅसवर एक जाळी ठेऊन त्यावर ७ ते ८ माध्यम आकाराचे कांदे, १ सुक्या खोबऱ्याची वाटी आणि ६ ते ७ हिरव्या मिरच्या खरपूस भाजून घ्या. सर्व पदार्थांचा रंग बदलेपर्यंत त्यांना भाजून घ्यावे.
- आता हे पदार्थ गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घाला. यामध्ये १/४ कप कोथिंबीर, १५-२० लसणीच्या पाकळ्या, आले आणि अर्धा कप पाणी घालून सर्व घटक वाटून घ्यावे.
- ग्रेव्हीसाठी वाटण तयार आहे.
मटण शिजवणे
- एका पातेल्यामध्ये एक किंवा दोन चमचे तेल घालून घ्या.
- तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लाल तिखट घालून, कांदा शिजेपर्यंत छान परतून घ्यावे.
- शिजणाऱ्या कांद्यामधून तेल सुटू लागल्यानंतर, त्यामध्ये तयार केलेले ग्रेव्हीचे वाटण घालून घ्या.
- त्यामध्ये पुन्हा थोडेसे तिखट घाला.
- काही मिनिटे सर्व पदार्थ परतून घेतल्यानंतर, सुरवातीला हिरवे वाटण लावून ठेवलेले मटणाचे तुकडे एक-एक करून कढईमध्ये घालावे.
- आता मटणाचे तुकडे व्यवस्थित ढवळून घ्या. पातेल्यातील सर्व मसाले आणि वाटण मटणाला नीट लागतील याची खात्री करा.
- आता तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यावे शिजवावे.
- आता यामध्ये गरम मसाला किंवा काळा मसाला घालून घ्या.
- सर्व पदार्थ व्यवस्थित शिजल्यानांतर त्यावर कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून घ्यावे.
- तयार आहे आपली खानदेशी पद्धतीने बनवलेली झणझणीत मटण करी.
हेही वाचा : Recipe : पोळीप्रमाणे झटपट लाटा तांदळाची भाकरी; बोनस टीपसह पाहा ‘ही’ सोपी ट्रिक
ही मटण करी तुम्ही भाकरी, भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @natashaagandhi या अकाउंटने शेअर केलेल्या मटण करीच्या रेसिपी व्हिडीओला आत्तापर्यंत ३०२K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.