आपल्याकडे असे अनेक पदार्थ आहेत जे की गेल्या कित्येक पिढ्यांपासून तयार केले जातात आणि आवडीने खाल्ले जातात. पण बऱ्याच पदार्थांबाबत आपल्याला माहित नसते. कारण फास्टफूडच्या मागेळ पळणाऱ्या आपल्या पिढीमध्ये हे पदार्थ मागे पडत आहेत. असे अनेक पदार्थ आहे जे अत्यंत चविष्ट आहेत पण आजकाल आपल्या आहारामध्ये दिसत नाही. अशाच विस्मृतीत चालेल्या पदार्थाची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा पदार्थ आहे गोळवणी. तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की तयार करून पाहा. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी.
गोळवणी तयार करण्याची रेसिपी
गोळवणी तयार करण्याचे साहित्य
डाळीचे पीठ(बेसन) अर्धी वाटी, कांदा १ बारीक चिरलेला, चिंचेचा कोळ ३-४ चमचे, बिरड्याचे वाटण १ चमचा, तळलेला मसाला २ चमचे, मीठ आणि गूळ चवीप्रमाणे, मोहरी पाव चमचा, हिंग चीमूटभर, हळद पाव चमचा, नारळाचे दूध अर्धी वाटी किंवा वाटलेलं खोबरं अर्धी वाटी.
हेही वाचा – दह्यातले वांग्याचे भरीत – खवय्यांसाठी रुचकर घरगुती पदार्थ! जाणून घ्या रेसिपी
गोळवणी तयार करण्याची कृती
प्रथम डाळीच्या पिठात बिरड्याचे वाटण, हळद, १ चमचा, तिखट, २ चमचे चिंचेचा कोळ, गूळ, मीठ आणि पाणी घालून भिजवा.
पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी हिंगाची फोडणी करा आणि त्यावर कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. नंतर त्यावर हळद तिखट, मीठ, तळललेला मसाला, मीठ, गुळ आणि पाणी घालून नीट उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर भिजवलेल्या पिठाचे लहान लहान गोळे करून टाका. नंतर उरलेल्या पिठात घालून आमटीत घाला म्हणजे आमटीला घट्टपणा येईल. चांगले उकळ्यावर गोळे फुगून मोठे होतील. गोळे शिजल्यावर गॅस बंद करा.
हेही वाचा – Raw Mango Rasam Recipe: घरीच बनवा कैरीचे रस्सम, भात-पापडसोबत मारा ताव!
टीप – ही गोळवणी अतिशय चविष्ट, तिखट, आंबट -गोड लागते. भाताबरोबर छान लागते. परंतु हल्ली विस्मृतीत चालली आहे.