बाजारात भाजी खरेदीसाठी गेल्यानंतर आपण फ्लॉवर, सिमलामीरची, मटार, वांगी यांसारख्या भाज्या पटकन विकत घेतो. मात्र सर्वात कमी आणि अतिशय दुर्लक्ष केली जाणारी भाजी म्हणजे कारली. अनेकांना या भाजीच्या कडवटपणामुळे, त्याच्या कारेटी आवरणामुळे किंवा एकंदरती नाव ऐकुनाच ती खाण्याची इच्छा होत नाही. प्रत्येक भाजीचे आपापले गुणधर्म असतात; तसेच कारल्याचेदेखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे असतात. त्यामुळे प्रत्येक भाजी ही आपण खाल्ली पाहीजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र असे असले तरीही अनेकांना या भाजीचा कडवटपणा, त्याची कडू चव कशी घालवायची ही समजत नाही. त्यासाठी एक-दोन उपाय आहेत. पहिला म्हणजे, कारली चिरून त्यांच्या बिया काढून, कारल्याला काहीवेळासाठी मीठ लावून ठेवणे किंवा पाण्यामध्ये मीठ घालून कारल्याच्या चिरलेल्या फोडी पंधरा ते तीस मिनिटांसाठी त्यामध्ये बुडवून ठेवणे. यामुळे भाजीचा कडवट पणा निघून जातो आणि ती सहज खाता येते. इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर maharashtrian_recipes नावाच्या अकाऊंटने मसालेदार कारल्याच्या भाजीची रेसिपी शेअर केली आहे. त्यामध्ये कारल्याची कडू चव घालवण्यासाठी अजून एक वेगळी पद्धत दाखवली आहे. काय आहे रेसिपी आणि टीप पाहा.

हेही वाचा : Recipe : हिवाळ्यात बनवा बाजरीचे पौष्टिक थालीपीठ; काय आहे रेसिपी अन् प्रमाण पाहा…

मसालेदार कारल्याची भाजी रेसिपी

साहित्य

२५० ग्रॅम कारले
पाणी
चिंच
मीठ
तेल
जिरे
हळद
तिखट

कृती

सर्वप्रथम कारल्यामधील सर्व बिया काढून घेऊन कारले चिरून घ्या.
एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये चिंच घालून पाणी उकळू द्या. पाणी उकळ्यानंतर त्यामध्ये चिरलेले कारले घालून पातेल्यावर झाकून ठेवा. आता पाच ते सात मिनिटांनी पातेल्याखालील गॅस बंद करून घ्या.
कढईमध्ये एक चमचा तेल घालून ते व्यवस्थित तापू द्या.
त्यामध्ये जिरे, हळद आणि लाल तिखट घालून मसाले एक दोन मिनिटांसाठी परतून घ्या.
त्यामध्ये कारल्याचे तुकडे करून सर्व कारली मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यावे.
तयार आहेत आपली मसालेदार, आणि चमचमीत अशी कारल्याची भाजी.

ही झटपट तयार होणारी, आणि कडू न लागणाऱ्या कारल्याच्या रेसिपीच्या व्हिडिओल आत्तापर्यंत २७.५ k इतके व्ह्यूज मिळाळले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make spicy masaledar karela sabji recipe homemade bitter gourd sabji recipe dha
Show comments