उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण सर्वजण असे काही खाण्याचा आणि पिण्याचा विचार करतो ज्यामुळे आपल्या शरीराला आतून थंडावा मिळेल आणि या ऋतूत उसाच्या रसापेक्षा चांगलं काय असू शकतं. या दिवसात रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी उसाचा ताजा रस प्यायला मिळतो. उसाचा रस शरीराला त्वरित शीतलता देते आणि हृदयाला आणि मनाला ताजेतवाने ठेवते. पण घरी उसाचा रस तयार करणे थोडे कठीण आहे. अनेक वेळा लोकांना ते बाहेरू जाऊन पिणे शक्य होत नाही. मग हा रस घरी कसा तयार करायचा? त्यासाठी तुम्हाला उसाच्या रसाची मशीन घेण्याची गरज नाही. कोणत्याही मशीन शिवाय आज ऊसाचा रस घरी तयार करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मशिनशिवाय घरीच बनवा उसाचा रस

साहित्य

  • १/२ किलो गूळ
  • कोथिंबीरीची पाने
  • पुदीना
  • काळे मीठ
  • लिंबू

    कृती
  • सर्व प्रथम गुळाचे छोटे तुकडे करून घ्या.
  • आता गूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. गूळ पाण्यात चांगला विरघळल्यावर गाळून एका भांड्यात घ्या.
  • आता पुदिन्याची पाने, लिंबाचा रस आणि काळे मीठ मिक्सरमध्ये टाकून चांगले वाटून घ्या.
  • नंतर त्यात गुळाचे पाणी घालून पुन्हा एकदा चांगले एकजीव करा.
  • आता त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि थोडा वेळ फ्रिंजमध्ये ठेवा
  • आता एका भांड्यात गाळून घ्या आणि बाहेर काढा. तुमचा घरगुती उसाचा रस तयार आहे.