Sweet Corn Dhokla: आजच्या काळात खाद्यपदार्थाचे नवनवीन प्रयोग करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत. जुन्या पदार्थांना एक नवा ट्विस्ट देऊन काही तरी पौष्टीक पदार्थ बनवण्यात प्रत्येकाचा कल दिसत आहे. अनेक इन्फ्लुएन्सर, शेफ तर काही तरुण मंडळी सुद्धा त्यांनी केलेला प्रयोग व्हिडीओमार्फत अनेकांपर्यंत पोहचवत आहेत. रविवार असो किंवा कोणी पाहुणे मंडळी घरी येणार असो १५ मिनिटांत काय बनवायचा प्रश्न पडला तर आपण सगळेच ढोकळा हा पर्याय सगळ्यांना बेस्ट वाटेल. पण, तुम्ही कधी मक्याचा ढोकळा खाल्ला आहे का? नाही… तर आज आपण मक्याचा ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. चला तर पाहू या पदार्थाची सोपी रेसिपी…

साहित्य –

१. बारीक रवा १ कप
२. बेसन १/४ कप
३. दही एक कप
४. एक कप पाणी
५. मक्याचे दाणे
६. आलं
७. लसूण
८. मिरची
९. कोथिंबीर
१०. हळद
११. इनो
१२. तिखट
१३. मीठ

हेही वाचा…Monsoon Special Recipe: पावसाळ्यात काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते? तर कांदा, ब्रेडसह बनवा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ; रेसिपी लगेच नोट करा

कृती –

१. एका प्लेटमध्ये बारीक रवा, बेसन आणि दही घ्या.
२. नंतर त्यात एक कप पाणी घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
३. १५ मिनिटे हे मिश्रण असंच ठेवून द्या.
४. दुसरीकडे मक्याचे दाणे, आलं, लसूण, मिरची मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या.
५. तयार पेस्ट तयार करून घेतलेल्या मिश्रणात घाला.
६. त्यानंतर त्यात कोथिंबीर, मक्याचे दाणे, हळद, मीठ घालून घ्या.
७. मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्या आणि त्यात वरून इनो टाका.
८. त्यानंतर तयार मिश्रण एका प्लेटमध्ये व्यवस्थित पसरवून घ्या वरून तुम्हाला आवडत असेल तर चिमूटभर मसाला टाका.
९. नंतर १५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या.
१०. १५ मिनिटानंतर सजावटीसाठी वरून कोथिंबीर टाका आणि व्यवस्थित काप करून घ्या.
११. अशाप्रकारे तुमचा मक्याचा ढोकळा तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि ही रेसिपी @yumyum_cooking या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

मक्याचे आरोग्यदायी फायदे –

पावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची रेलचेल सुरु होते. त्यामुळे अनेक गृहिणी त्यापासून विविध पदार्थ करताना दिसतात. मक्याचं कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते.मक्यामध्ये पित्त आणि वात कमी करण्याचे गुणधर्म असतात असेही म्हंटले जाते. . मक्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहते. तर अशा अनेक आरोग्यदायी फायदे असलेल्या मक्यापासून तुम्ही देखील हा खमंग ढोकळा बनवून पाहा आणि लहान मुलांनाही खाऊ घाला.