Sweet Corn Soup : नेहमी टोमॅटोचे सार खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही मक्याचे सार बनवू शकता. मका हा आरोग्यासाठी अत्यंत पौष्टीक आहे. चांगल्या आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांकडून मका खाण्याचा सल्ला दिला जातो. मका तुम्ही भाजूनही खाऊ शकता पण मक्याचे सारही तितकेच टेस्टी आणि हेल्दी असते. मक्याचे सार घरी बनवायचे असेल तर ही सोपी रेसिपी जाणून घ्या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :-

  • मक्याची कणसे
  • आमसुल
  • जिरे
  • कढीपत्ता
  • हिंग
  • हिरव्या मिरच्या
  • तूप
  • मीठ

हेही वाचा : Tongue colour Samudrika Shastra : तुमची जीभ कोणत्या रंगाची? जिभेवरून ओळखा माणसाचा स्वभाव

कृती

  • सुरुवातीला मक्याचे दाणे उकळून घ्या
  • त्यानंतर उकळलेले मक्याचे दाणे बारीक वाटून घ्या
  • मक्याचा रस गाळून घ्या.
  • गरम पाण्यात ४-५ आमसुलं भिजत घाला.
  • हाताने कुस्करून आमसुलाचे पाणी काढा आणि हे पाणी मक्याच्या रसात टाका.
  • कढईत तेल गरम करा त्यात जिरे, मिरच्या कढीपत्ता आणि हिंग घालून फोडणी द्या.
  • त्यानंतर ही फोडणी मक्याच्या रसावर घाला.
  • वरुन चवीपुरते मीठ घाला.
  • हे सार तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make sweet corn soup recipe healthy food for healthy lifestyle ndj
Show comments