[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरात छोट्या बाळाची चाहूल लागली, की सगळं घर आनंदून जातं. भल्याभल्यांना उत्साह येतो, घर नीट आवरलं जातं. होणाऱ्या आईला वेगळंच महत्त्व मिळतं. तिचं कोडकौतुक केलं जातं, तिला हवंनको ते बघितलं जातं. तिच्या मनासारखं सगळं केलं जातं. तिचे डोहाळे पुरवले जातात. त्या निमित्तानं आई न होणारे घरातले इतरही आपल्या पोटाचे डोहाळेही पुरवून घेतात. अशा कौतुकसोहळ्यात न्हाऊन निघाल्यानंतर आणि अतिप्रेमानं चिंब झाल्यानंतर ते बाळ राजेशाही थाटात घरात येतं. तो किंवा ती, जे कुणी असेल, त्याच्यावर अपार माया केली जाते. त्याच्या रूपाचं कौतुक होतं, त्याच्यातल्या शोधून शोधून काढलेल्या गुणांचं कौतुक होतं. काही दिवस, काही महिने जातात आणि आता बाळ मोठं होऊ लागतं. ते आणखी मोठं झाल्यानंतर घरात दुसऱ्या बाळाची चाहूल लागते आणि मोठ्या बाळाचं कौतुक जरा कमी होतं. छोटं नवं बाळ दाखल झाल्यानंतर तर मोठ्या बाळाला एकदम दादा किंवा ताई करून टाकलं जातं आणि त्याच्यावर प्रचंड जबाबदारी येते. त्याच्यापेक्षा छोट्या बाळाचे गुणच मग डोळ्यांत भरू लागतात. स्वीट कॉर्न हे असंच घरातलं छोटं बाळ आहे. पूर्वीच्या ताज्या रसाळ फळांच्या जागी सीडलेस फळं आल्यानंतर त्यांनीच सगळं कौतुक मिळवलं ना, तसंच आता स्वीट कॉर्नचं झालंय. मूळच्या साध्या कणसांचं कौतुक कमी झालंय. कधीकधी तर ती शोधूनच काढावी लागतात. खरंतर दोघांचंही समान कौतुक व्हायला हवं, पण तो दिवस कधी उजाडेल तेव्हा उजाडेल. त्याच्या या कर्तृत्वाला काय उपमा द्यायची ते नंतर बघू. त्याचा उपमा मात्र झकास होतो, हे नक्की. आज हादडूया, स्वीट कॉर्न उपमा.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • २ वाट्या मक्याचे कोवळे दाणे
  • हिरव्या मिरचीचे तुकडे
  • कढिपत्ता
  • कांदा
  • मीठ चवीप्रमाणे
  • लिंबू
  • फोडणीचे साहित्य, तेल

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • कांदा उभा चिरून घ्यावा.
  • तेलाची खमंग फ़ोडणी करुन त्यात कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे घालावेत. कांदा तांबूस परतून घ्यावा.
  • त्यावर मक्याचा दाणे घालून चांगले एकजीव करावे.
  • एक वाफ आल्यानंतर मीठ, लिंबू घालून चांगले हलवावे.
  • मंद आचेवर शिजू द्यावे. मधूनमधून हलवत रहावे.
  • शिजल्यावर गॅस बंद करून कोथिंबिर घालून सजवावे.
  • आवडत असल्यास कांद्याबरोबर टोमॅटो घालूनही छान चव येते.

[/one_third]

[/row]