Amla Candy Recipe In Marathi : हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. चवीला तुरट असलेले आवळे अनेकांना आवडत नाही. पण, आवळा खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. त्यामध्ये मुरंबा, लोणचं, कँडी आदींचा समावेश असतो. तुम्हाला बाजारात विकत मिळणाऱ्या कँडी खायला आवडतात ना? तर आज आपण घरच्या घरी आवळा कँडी (Amla Candy ) कशी बनवायची हे पाहणार आहोत. सोशल मीडियावर एका युजरने या चटपटीत आणि हेल्दी पदार्थाची रेसिपी व्हिडीओत दाखवली आहे.
आवळा कँडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Amla Candy Ingredients ) :
१. ५०० ग्रॅम आवळा
२. ५०० ग्रॅम साखर
३. चवीनुसार मीठ
४. काळे मीठ
५. दोन चमचे लिंबाचा रस
६. १/२ चमचा तूप
७. १ चमचा मक्याचं पीठ
हेही वाचा…Home Made Maggy: चटपटीत नाश्त्यासाठी बनवा गव्हाच्या पिठापासून मॅगी; लहान मुलं होतील खूश
व्हिडीओ नक्की बघा…
आवळा कँडी बनवण्याची कृती (How To Make Amla Candy) :
१. आवळा कँडी बनवण्यासाठी आवळा मार्केटमधून घेऊन या.
२. ५०० ग्रॅम आवळा चाळणीमध्ये किंवा स्टीमरमध्ये १० मिनिटे उकडवून घ्या.
३. त्यानंतर बिया काढून घ्या आणि छोटे-छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
४. त्यानंतर एका पॅनमध्ये हे मिश्रण काढून घ्या आणि त्यात मिश्री पावडर (कँडी पावडर) किंवा गुळाची पवार घाला.
५. त्यानंतर त्यात थोडसं मीठ, काळ मीठ आणि लिंबाचा रस घाला. अधूनमधून हलवत राहावे.
६. मिश्रण थोडं घट्ट करण्यासाठी १ चमचा मक्याचं पीठ, एक चमचा पाण्यात मिसळून त्यात घाला.
८. नंतर मिश्रण घट्ट झाल्यावर एका साच्यात काढून घ्या आणि खाली बटर लावलेला पेपर सुद्धा ठेवा.
९. ३० ते ४० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा. त्यानंतर तयार मिश्रणाच्या छोट्या-छोट्या वड्या करून घ्या आणि पिठी साखरेमध्ये बुडवून घ्या.
१०. अशाप्रकारे तुमची आवळा कँडी तयार ( Amla Candy) .
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @myflavourfuljourney या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तुम्ही ही आवळा कँडी ( Amla Candy) एक वर्षापर्यंत साठवून ठेवू शकता. आवळ्यामधे ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. त्वचा, केस, पचनशक्ती, डोळे यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे ही आवळा कँडी अगदी लहानमुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरणार आहे असे म्हणायला हरकत नाही.