Tadka Idli Recipe: अनेकदा मुलं इडली खायला नकार देतात. अशा वेळी तुम्ही त्यांना फक्त काही मिनिटांत चवदार तडका इडली नक्कीच बनवून देऊ शकता. चला तर मग पटकन वाचा, तडका इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती
तडका इडली बनविण्यासाठी लागणारे साहित्य:
- ५-६ इडलीचे तुकडे
- २ बारीक चिरलेले कांदे
- १ चमचा आले-लसूण पेस्ट
- १ चमचा जिरे
- १ चमचा मोहरी
- १०-१२ कढीपत्त्याची पाने
- ५-६ हिरव्या मिरच्या
- २ चमचे लाल तिखट
- १ चमचा हळद
- १/२ वाटी कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
तडका इडली बनविण्याची कृती:
- सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे तेल ओतून, त्यात मोहरी आणि जिरे टाका.
- त्यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट घालून मिश्रण परतून घ्या.
- आता त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची व कढीपत्ताही घाला.
- त्यानंतर लाल तिखट व हळद, मीठ घाला आणि मिक्स करून त्यात इडलीचे तुकडे घाला आणि परतून घ्या.
- त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला.
- अशा प्रकारे तयार झाली तुमची तडका इडली.