Kaju Barfi : बर्फी हा गोड पदार्थ आपल्यापैकी अनेकांना आवडतो. कधी रव्याची बर्फी तर कधी बेसणाची बर्फी, कधी खव्याची बर्फी तर कधी तिळ आणि शेंगदाण्याची बर्फी आपण आवर्जून घरी बनवतो पण तुम्ही कधी काजूची बर्फी घरी बनवून खाल्ली आहे का? सहसा काजू बर्फी आपण खरेदी करुन खातो पण तुम्हाला काजूची बर्फी घरी बनवून खायची असेल तर ही रेसिपी नक्की नोट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • काजू तुकडे
  • नारळ
  • साखर
  • व्हॅनिला इसेन्स
  • तूप

हेही वाचा : पालकांनो, मुलांना सॅंडविच खूप आवडते, मग घरीच खाऊ घाला कडधान्याचे सँडविच, नोट करा ही रेसिपी

कृती

  • काजू थोडा वेळ पाण्यात भिजत घाला.
  • नारळ खरवडून घ्या.
  • नंतर काजू आणि खोबरे वाटून घ्या.
  • एका पातेल्यात खोबरे, काजू व साखर एकत्र करा.
  • मध्यम आचेवर हे मिश्रण ढवळत राहा.
  • जेव्हा मिश्रण घट्ट होईल तेव्हा त्यात इसेन्स घाला.
  • आणि कडेन तूप सोडा.
  • मिश्रण चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत मिश्रण टाका आणि नंतर त्याच्या वड्या तयार करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make tasty kaju barfi or kaju katli recipe sweet lovers ndj
Show comments