आपल्यापैकी अनेकांना गोड पदार्थ खायला आवडतो. तुम्ही कधी साटोऱ्या खाल्ल्या का? खव्याच्या किंवा साखर आणि खोबऱ्याच्या साटोऱ्या आपण अनेकदा करतो पण आज आम्ही तुम्हाला खजुराच्या साटोऱ्या कशा बनवायच्या, हे सांगणार आहोत. खुसखुशीत खजुराच्या साटोऱ्याची रेसिपी नोट करा.
साहित्य :
- मैदा
- कणीक
- पिठीसाखर
- खसखस
- बेसन
- मीठ
- वेलचींची पूड
- जायफळ पूड
- तेलाचे मोहन
- बिनबियांचा खजूर
- सुक्या खोबऱ्याचा कीस
- मिल्क पावडर
हेही वाचा : आषाढी एकादशीला करा गोड पदार्थ, असा बनवा चविष्ट राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा, रेसिपी जाणून घ्या
कृती :
- मैदा आणि कणीक एकत्र करा.
- त्या मीठ व मोहन घाला आणि घट्ट भिजवा.
- खसखस आणि खोबरे भाजा आणि बारीक करा
- कढईत तुप टाका आणि बेसन भाजून घ्या.
- खजूर मिक्सरमध्ये बारीक करा
- त्यानंतर भाजलेले बेसन, बारीक केलेले खजुर, बारीक केलेले खसखस आणि खोबरे एकत्र करा आणि सारण बनवा.
- भिजवलेल्या पिठाच्या दोन पुऱ्या लाटा. एका पुरीवर सारण ठेवा आणि त्यावर दुसरी पुरी ठेवा.
- दोन्ही पुरी एकमेकांवर दाबून कडा बंद करा.
- त्यानंतर पिठीचा वापर करुन साटोरी लाटा.
- लाटल्यानंतर ही साटोरी तव्यावर टाका. कडेने तूप सोडा.
- साटोरी चांगली भाजा.
- विशेष म्हणजे या साटोऱ्या पाच दिवस दिवस टिकतात.