Basmati Pulao : पुलाव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. जर नेहमी नेहमी वरण भात खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही मसालेदार बासमती पुलाव बनवू शकता. हा बासमती पुलाव खूप पौष्टीक आणि तितकाच चवदार असतो. आता घरच्या घरी बासमती पुलाव बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी ट्राय करा.
साहित्य
- बासमती तांदुळ
- फ्लॉवर
- वेलची
- काळी मिरची
- दालचिनी
- हळद
- उकळलेले पाणी
- मनुका
- मीठ
- तूप किंवा तेल
हेही वाचा : Kaju Barfi : घरीच बनवा टेस्टी काजू बर्फी, ही सोपी रेसिपी नोट करा
कृती
- तांदूळ धुवून घ्यावा.
- फ्लॉवर बारीक कापून घ्यावी.
- एका कढईत तेल गरम करावे.
- त्यात कांदा, फ्लॉवरचे तुकडे लसूण आणि सर्व मसाले टाकावे
- त्यात मशरूम, तांदुळ, टाकावे आणि थोडावेळ शिजवावे.
- नंतर उकळलेले पाणी आणि मीठ टाकावे आणि कढई झाकावी.
- १५ मिनीटांपर्यंत गॅस कमी आचेवर ठेवावा.
- भात शिजल्यानंतर त्यात मनुके आणि कोथिंबीर टाकावी आणि गरमागरम भात सर्व्ह करावा