Pahadi style chana dal recipe: रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला की जेवणाला काय वेगळं बनवानं सुचत नाही. तेच तेच खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा आलेला असतो. काय भाजी बनवावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही झटपट मुग पहाडी चणा डाळ भाजी बनवू शकता. रस्सा भाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट पहाडी चणा डाळीची रस्सा भाजी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया अशा चटकदार पहाडी चणा डाळ रस्सा भाजी रेसिपी कशी बनवायची.

पहाडी चणा डाळ बनवण्यासाठी साहित्य

winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती

१ कप हरभरा डाळ
१ कांदा बारीक चिरलेला
२ ते ३ सुक्या लाल मिरच्या
१ चमचा जिरे
२ इंच आल्याचा तुकडा
१ इंच दालचिनी
८ ते १० काळी मिरी
२ तमालपत्र
२ लवंग
२ वेलची
१ चमचा बडीशेप
१ चमचा लिंबाचा रस
१ चमचा देशी तूप
मीठ चवीनुसार
पाणी

पहाडी चणा डाळ बनवण्यासाठी कृती

पहाडी चणा डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप चणा डाळ नीट धुवून सुमारे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावी.

दरम्यान, मिक्सर ग्राइंडरमध्ये दोन ते तीन लाल मिरच्या, आल्याचा एक तुकडा, दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, एक चमचा जिरे, लवंग दोन ते तीन, दोन ते तीन वेलची, एक चमचा बडीशेप घाला.

सोबत लिंबाचा रस एकत्र मिक्स करा. थोडे पाणी घालून ग्राइंडरमध्ये बारीक पेस्ट तयार करा. कुकरमध्ये चणा डाळ टाका.

त्यात चवीनुसार मीठ, देशी तूप, हळद, चिमूटभर हिंग घालून शिजवावे. डाळ किमान चार ते पाच शिट्ट्यांमध्ये शिजवावे. जोपर्यंत ते चांगले वितळत नाही. कुकरचा प्रेशर निघाल्यावर कढईत तेल घालून गरम करावे.

तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात मसाला पेस्ट घालून परतून घ्या.

झाकून दोन ते तीन मिनिटे शिजवावे. मसाला चांगला भाजून झाल्यावर मसाल्यात शिजवलेली डाळ मिक्स करा. सुमारे पाच मिनिटे शिजवा.

हेही वाचा >> Health Tips: ऊर्जेने भरलेले हे हाय प्रोटीन सँडविच तुमचा नाश्ता बनवतील स्वादिष्ट ; मूग सँडविचची सोपी रेसिपी

जेणेकरून डाळ चांगली शिजते आणि मसाल्यातही मिसळते. बारीक चिरलेल्या कोथिंबीरने सजवून गरमागरम भात किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.