रोज तेच तेच खाऊन कंटाळला आहात का? आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत जी तुम्हाला नक्की आवडले. ज्या लोकांना भात खायला आवडतो त्यांनी हा वांगी भात नक्की ट्राय करावा. अनेक लोकांना वांगी आवडतात. त्यामुळे अनेकदा आपण भरलेली वांगी किंवा वांगीची भाजी करतो पण तुम्हा आता खमंग चमचमीत वांगी भाताचाआस्वाद घेऊ शकता. हा वांगी भात कसा बनवायचा, जाणून घेऊ या.

साहित्य :

  • तांदूळ
  • वांगे
  • तेल
  • लाल पावडर
  • हळद
  • ओले खोबरे
  • कोथिंबीर
  • धने-जिरे पावडर
  • गोडा मसाला
  • गरम पाणी
  • मीठ

हेही वाचा : Malpua Recipe : असा बनवा टेस्टी खव्याचा मालपुवा; रेसिपी नोट करा

कृती :

  • सुरवातीला तांदूळ धुवून घ्यावे
  • त्यानंतर चाळणीत तांदूळ निथळू द्यावा.
  • कढईत तेल टाकावे आणि तेल थोड तापू द्यावे.
  • तेल तापल्यावर वरील सर्व मसाले टाकून फोडणी द्यावी.
  • फोडणीनंतर तांदूळ चांगला परतून घ्यावा.
  • त्यानंतर त्यावर वांगी, हळद तिखट, धने-जिरे पावडर आणि गोडा मसाला घालून चांगले परतावे
  • वरुन गरम पाणी, मीठ घालावे.
  • मंद आचेवर भात शिजू द्यावा.
  • भात शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालावी.