Puran Poli Recipe : दरवर्षी श्रावण महिन्यात अमावस्याच्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात खास करुन विदर्भात हा सण खूप जल्लोषाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पुजा केली जाते. या दिवशी पुरण पोळी हा पदार्थ नैवद्य म्हणून बैलांना दाखवला जातो.
खरं तर पुरण पोळी खासकरुन सणासुदीला आवडीने बनवली जाते. पण अनेक लोकांना पुरण पोळी फुटेल का, याची भीती वाटते. टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स आणि विदर्भ स्टाइल पुरण पोळी कशी बनवायची, हे सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

  • चणा डाळ
  • तांदूळ पीठ
  • गव्हाचं पीठ
  • तेल
  • तूप
  • वेलची
  • जायफळाची पूड
  • मीठ

हेही वाचा : Ukadiche Modak : गणपतीच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे? नोट करा ही सोपी रेसिपी

कृती :

  • चणा डाळ तीन तास भिजू घाला
  • त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये चांगली शिजवा
  • शिजलेली डाळीत वेलची आणि जायफळाची पूड टाका
  • आणि गरम गरम डाळ पुरणयंत्रात घालून चांगली वाटून घ्या.
  • मीठ घालून गव्हाचं पीठ पाण्याने भिजवावे.
  • त्यावर तेल टाकून पीठ चांगले मळून घ्यावे
  • पीठाचा गोळा करुन छान पातळ पोळी लाटावी
  • पोळीचा वाटीसारखा आकार करुन त्यात पुरणयंत्रात वाटलेली डाळीचा गोळा टाकावा आणि हाताने ही पुरण पोळी थापावी.
  • गरम तव्यावर तुप घालून ही पुरण पोळी भाजावी.
  • सर्व्ह करताना पुरण पोळीवर गरम गरम तूप टाकावे

हेही वाचा : Crispy Chakli : चकल्या कुरकुरीत होण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स, नोट करा ही रेसिपी

टिप्स :

  • पुरण पोळी भाजताना गॅस मंद आचेवर ठेवा
  • पुरण पोळी लगेच डब्यात भरु नका. कागदावर गार होऊ द्या.
  • पुरण पोळी चांगली भाजा. अनेकदा व्यवस्थित न भाजल्यामुळे पुरण पोळी फुटते.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make tasty vidarbh style puran poli follow tips not to break puran poli ndj
Show comments