Paneer Dhirde Recipe: पनीर धिरडे असा पदार्थ आहे जो तुम्ही सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपार किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत केव्हाही खाऊ शकता. घरांमध्ये नेहमी पारंपरिक पद्धतीने धिरडे तयार केले जाते, परंतु जर तुम्ही त्याला थोडासा ट्विस्ट देऊ इच्छित असाल तर मग पनीर धिरडे नक्की तयार करुन बघा.

पनीर धिरडे स्वादिष्ट तर आहेच पण तो आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. पनीरमुळे त्यामध्ये प्रथिनांचा भरपूर स्त्रोत असतो. मोठ्यापासून छोट्यांपर्यंत सर्वजण हा पदार्थ आवडीने खातात. तुम्ही बेसनाच्या किंवा मुगाच्या धिरड्याचा आस्वाद कित्येक वेळा घेतला असेल पण यावेळी जरा हटके आणि नवीन पदार्थाचा आस्वाद घेऊ या.

पनीर धिरड्याची रेसिपी अगदी सोपी आहे आणि हे झटपट तयार केली जाऊ शकते. याच कारणामुळे पनीरचे धिरडे नाश्त्याच्या वेळी खाण्यासाठी पसंती दिली जाते. जर तुम्ही कधी पनीरचे धिरडे केले नसेल तर आम्ही सांगितलेली सोप्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही ते सहज तयार करु शकता.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
paneer makana tikki recipe
पनीरची नवी रेसिपी ट्राय करायचीय? अवघ्या काही मिनिटांत करा ‘पनीर मखाना टिक्की’
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

हेही वाचा : डाळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवणे का महत्वाचे आहे? जाणून घ्या ‘आयुर्वेद’ काय सांगते

पनीरचे धिरडे तयार करण्यासाठी रेसिपी

साहित्य

  • किसलेले पनीर – १.५ कप
  • बेसन – २ वाट्या
  • ओवा- १/२ टीस्पून
  • हिरवी मिरची चिरलेली – ३-४
  • चाट मसाला – १ टीस्पून
  • हिरवी कोथिंबीर चिरलेली – 3 चमचे
  • तेल
  • मीठ – चवीनुसार

कृती

पनीरचे धिरडे तयार करण्यासाठी प्रथम पनीर किसून घ्या. आता एका खोलगट भांड्यात बेसन घालून घेऊन त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, चाट मसाला आणि ओवा घालून एकत्र करुन घ्या. आता थोडं थोडं पाणी घालून बेसनाचे पीठ तयार करा. बेसनाचे पीठ जास्त पातळ किंवा घट्ट नसावे हे लक्षात ठेवा.

आता एक नॉनस्टिक पॅन मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा. आता एका चमच्याने बेसनाचे पीठ घेऊन ते तव्याच्या मध्यभागी ओतावे आणि गोल गोल पसरावे. यानंतर किसलेले पनीर धिरड्यावर सर्वत्र पसरावा आणि चमच्याने हलके दाबून घ्या.

हेही वाचा : Cucumber Cold Soup Recipe: उन्हाळ्यात प्या थंडगार काकडी सूप; दिवसभर राहा हायड्रेट

यानंतर धीरड्यावरवर थोडा चाट मसाला टाका. थोड्या वेळाने धिरडे पलटून दुसऱ्या बाजूला तेल लावा. पनीरचे धिरडे दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. यानंतर पनीर धिरडे एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचप्रमाणे एक एक करून सर्व पिठ आणि पनीरचे धिरडे तयार करा. चवदार पनीरचे धिरडे हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.