Soft chapati Recipe : चपाती भाजी हा आहारातील महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवतात पण काही लोकांना नीट चपाती बनवता येत नाही. मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण तीन पदरी घडीची मऊ चपाती कशी बनवायची, या विषयी जाणून घेणार आहोत.
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मऊ लुसलुशीत ३ पदरी घडीची चपाती कशी बनवायची, त्याविषयी सांगितले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही ३ पदरी घडीची चपाती बनवू शकता. (How to make three layered chapatis know easy recipe of soft chapati recipe food news in marathi)

या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

मऊ अन् लुसलुशीत चपातीची सोपी रेसिपी (easy recipe of soft chapati)

makar sankranti 2025 til gul ladoo recipe in marathi easy til ladoo recipe for sankranti
तिळगुळ घ्या गोड गोड बोला! ‘या’ मकरसंक्रांतीला बनवा परफेक्ट तिळाचे लाडू, लिहून घ्या सीक्रेट रेसिपी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
How long to boil eggs
कच्ची अंडी किती वेळ उकळायला हवी? अंडी उकडण्याची ३- ३- ३ पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का?
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
crispy twister recipe
Crispy Twister Recipe: कुरकुरीत आणि चवदार खायचंय? मग बटाट्याची ‘ही’ रेसिपी ट्राय कराच
crispy peas triangle recipe in marathi
Crispy Peas Triangle: नववर्षाच्या सुरूवातीला ट्राय करा मटारची ‘ही’ नवीकोरी रेसिपी, साहित्य आणि कृती घ्या लिहून
Matar cutlets recipes
मटार कटलेटची झटपट होणारी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; पटकन वाचा साहित्य आणि कृती

सुरुवातीला भिजवलेल्या कणकीचा मोठा गोळा घ्या. त्यानंतर आयाताकृती आकाराने हा चपातीचा गोळा लाटा आणि त्याचे तीन भाग करा. त्यानंतर या तीन भागावर तेल लावा. चपातीचे तीन भाग एकमेकांवर ठेवा आणि पोळी लाटा. गोलाकार पोळी लाटल्यानंतर तव्यावर ही पोळी भाजून घ्या. कापसासारखी मऊ आणि लुसलुशीत पोळी तयार होईल. तुम्ही ही पोळी मुलांच्या टिफीनवरही देऊ शकता. या व्हिडीओवर लिहिलेय, “महाराष्ट्रीयन पद्धतीची ३ पदरी घडीची चपाती.कापसासाररखी मऊ आणि लुसलुशीत चपाती”

हेही वाचा : मुलांच्या डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी झटपट बनवा तांदळाचे वडे; लिहून घ्या साहित्य आणि कृती

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : RasMalai Sandwich: रक्षाबंधनला लाडक्या भावासाठी बनवा टेस्टी ‘रसमलाई सँडविच’; रेसिपी नोट करून घ्या

maaulis_kitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “३ पदरी घडीची चपाती मऊ लुसलुशीत महाराष्ट्रीयन पध्दतीची महाराष्ट्रीयन स्टाइल चपाती”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही चार पदरी चपाती करतो.” तर एका युजरने लिहिलेय, “माझी मावशी इतकी सुंदर चपाती बनवते कि ४ दिवस चपाती मऊ राहते आणि खूप बारीक सुद्धा….” आणखी एका युजरने लिहिलेय, “आई ची आठवण आली…ती पण अशीच बनवते….गावी गेल्यावर तिलाच जेवण बनवायला लावतो..” हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या आईची आठवण आली. काही लोक त्यांच्याकडे कशी चपाती बनवतात, याविषयी सांगताना दिसतात.

Story img Loader