Makar Sankranti 2024: तिळाचे लाडू कडक होतात? ‘ही’ ट्रिक वापरून संक्रांतीला बनवा कडक न होणारे मऊ तिळाचे लाडू…मकर संक्रांत असा हिंदू सण आहे; जो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. तसेच ‘तिळगूळ घ्या; गोड गोड बोला’, असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकर संक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. मकर संक्रांतीला स्त्रिया हळदीकुंकू ठेवतात आणि इतर स्त्रियांना वाण देतात. आज आपण मकर संक्रांतीनिमित्त अर्धा किलो तिळाचे लाडू बनवण्याची कृती पाहणार आहोत. कधी कधी तिळाचे लाडू अगदीच कडक होतात. त्यामुळे घरातील सदस्य खासकरून लहान मुलं हे आवडते लाडू खाण्यास कंटाळा करतात. तर हे लाडू मऊ कसे राहतील यासाठी एक खास टीपसुद्धा पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य :

  • तीळ अर्धा किलो
  • शेंगदाणे पाव किलो
  • चण्याची डाळ २५ ग्रॅम
  • अर्धा किलो गूळ
  • वेलची पावडर

हेही वाचा…Orange Barfi: नागपूरची प्रसिद्ध संत्र्याची बर्फी; आता घरच्या घरी होईल झटपट तयार… नोट करा रेसिपी

कृती :

  • सगळ्यात पहिल्यांदा टोप किंवा कढईत तीळ आणि शेंगदाणे वेगवेगळे भाजून घ्या. भाजून घेतल्यावर एका ताटात काढून ठेवा.
  • नंतर कढई घ्या आणि एक चमचा तेल किंवा तुपात गूळ बारीक करून टाका आणि गूळ पूर्ण वितळवून घ्या.
  • बोटाला गूळ चिकटतो आहे का हे तपासून घ्या आणि मग नंतर शेंगदाणे, तीळ, वेलची पावडर, भाजलेल्या चण्याची डाळ आदी सर्व टाकून मिश्रण हलवून घ्या.
  • मिश्रण एकजीव झाल्यावर ताटात काढून घ्या आणि लाडू वळण्यास सुरुवात करा.
  • (टीप- मिश्रण गरम असताना लाडू वळून घ्या. मिश्रण गरम असताना लाडू वळून घेतल्यास लाडू सहज वळता येतात आणि ते मऊसुद्धा होतात.)
  • अशा प्रकारे तुमचे संक्रांतीनिमित्त ‘तिळाचे मऊ लाडू’ तयार.