पावसाळ्यामध्ये आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारही पोषक घ्यायला हवा. पावसाळ्यात सगळीकडे चिखल, ओलावा, दमटपणा यामुळे जीवजंतू वाढतात. शिवाय आजार पसरवणाऱ्या किटाणूंची पैदास होते. दूषित पाणी, वाढलेल्या मच्छरांमुळे आजार होतात. पावसात सतत हवामानात बदल होत राहतो. कधी अचानक गरम वाटायला लागतं तर, कधी खूप थंड त्यामुळे वारंवार आजारी होण्याचा धोका असतो.
त्यामुळे या काळात तब्ब्येतीची काळजी घ्यावी लागते.पावसाळ्यात आजारपणापासून वाचण्यासाठी आहारात काढ्याचा समावेश करणं गरजेचं आहे. तुळस आणि हळद या दोन्हीचे नैसर्गिक गुणधर्म तुम्हाला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. चला तर मग पाहुयात तुळशी-हळदीचा काढा कसा बनवायचा.
तुळशी-हळदीचा काढा साहित्य ?
- अर्धा टीस्पून हळद
- ८-१२ तुळशीची पाने
- २-३ चमचे मध
- ३-४ लवंगा
- दालचिनीची कांडी
तुळशी आणि हळदीचा काढा कसा बनवायचा?
- तुळस आणि हळदीचा काढा बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करा.
- आता त्यात अर्धा चमचा हळद, ८-१२ तुळशीची पाने, २ टेबलस्पून मध, ३-४ लवंगा आणि थोडे दालचिनी घाला.
- मिश्रण १५ मिनिटे उकळू द्या. आता हे मिश्रण गाळून घ्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे मध घालू शकता.
- रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि मान्सूनच्या सर्व आजारांशी लढण्यासाठी शरीराला बळकट करण्यासाठी दिवसातून एकदा या काढ्याचे सेवन करा.
हेही वाचा – पावसाचा आनंद करा द्विगुणीत अन् घरीच बनवा कुरकुरीत कोबी भजी, जाणून घ्या सोपी रेसिपी
तुळस-हळद पिण्याचे आरोग्य फायदे
तुळस-हळदीचा काढा पिण्याने केवळ रोगप्रतिकारशक्ती मजबूत होत नाही, तर इतर अनेक आजारांचा धोका कमी करण्यात मदत होऊ शकते. मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी या पेयाचे सेवन करू शकतात.
हे शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास आणि प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
बद्धकोष्ठता आणि लूज मोशनची समस्या दूर करण्यासाठीही या उकडीचे सेवन फायदेशीर मानले जाते.
सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळण्यासाठीही याचे सेवन केले जाऊ शकते.
पावसाळ्यात रोगराईची लागण होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात बऱ्याचदा प्रतिकारशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात काढ्याचा समावेश केला तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते.