Shravan Special 2023 : सणांचा हंगाम आता सुरू झाला आहे आणि हळूहळू श्रावण, गणपती नंतर नवरात्री असे अनेक सण येतील. अशा वेळी लोक उपवास आणि उपासनेत अधिक व्यस्त असतात. असे बरेच लोक आहेत जे दिवसभर काहीही खात नाहीत आणि काहींना उपवासात फलाहार घेणे आवडते. भारतात, उपवासाला खूप मान्यता आहे आणि जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे श्रावणात बरेच वार उपवास ठेतात, तर त तुम्हाला अधिक उपवासांमुळे कमजोरी देखील येऊ शकते. उपवासाच्या दिवशी आहारात समावेश करण्यासाठी एक टेस्टी पदार्थ आम्ही घेऊन आलो आहोत. या पदार्थचं नाव आहे, उपवासाचा मेदू वडा. चला तर मग पाहुयात उपवासाच्या मेदू वड्याची सोपी मराठी रेसिपी.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
उपवासाचा मेदू वडा साहित्य :
- १ कप वरी
- एक मोठा उकडलेला बटाटा
- १/४ कप शेंगदाणे कुट
- १/४ कप दही
- १ चमचा जिरे
- ४ मिरच्या बारीक चिरुन
- २ चमचे बारीक कापलेले ओले खोबरे
- मीठ
- तळण्यासाठी तेल
उपवासाचा मेदू वडा कृती :
- २ कप गरम पाण्यात मीठ घालून भगर धुवून घालावी आणि त्याचा भात करून घ्यावा.
- त्यानंतर भात पूर्ण थंड झाल्यावर मोकळा करून त्यात बटाटा किसून घालून घ्यावा.
- त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, दही, जिरे, खोबरे, मिरची, मीठ घालून पाच मिनिटे चांगले मळून घ्यावे.
- त्यानंतर त्याचे मेदू वड्यासारखे गोळे करून घ्यावे. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात वडे तळून घ्यावेत.
हेही वाचा – Sabudana Chivda : श्रावणात बनवा टेस्टी साबुदाणा चिवडा, ही रेसिपी नोट करा
- हे खुसखुशीत उपवासाचे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.
First published on: 18-08-2023 at 14:13 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make upvasacha medu vada shravan special best ingredients for full day fasting or vrat what we should eat in vrat upvasacha medu vada fasting recipe srk