वडापाव खायला अनेकांना आवडतो. वडापावचं नुसतं नावं जरी काढलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. दरवर्षी २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा केला जातो. हल्ली प्रत्येक गल्लीत वडापावचे स्टॉल दिसतात. वडापावची सुरुवात मुंबईत झाली हे प्रत्येकाला माहीत असेलच. मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी वडापाव हा पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत दिवस रात्र कधीही वडापाव खायला मिळतो. अनेकजण वडापाव घरी देखील बनवतात. मात्र त्यांना वडापाव मध्ये असणारी लाल लसूण चटणी कशी बनवायची हे माहीत नसते. बाजारात मिळणाऱ्या लाल लसूण चटणीची चव वेगळी असते. तशी चटणी जर तुम्हाला घरच्या घरी बनवायची असेल तर आज आम्ही तुम्हाला याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारं साहित्य

  • बेसनाचा तळलेला चुरा- १ कप
  • तळलेल्या लसूण पाकळ्या- ४ ते ५
  • लाल मिरची पावडर- २ टेबलस्पून
  • बेसन- ४ टेबलस्पून
  • पाणी
  • तेल- ४ ते ५ टेबलस्पून
  • मीठ

जाणून घेऊया बनवायची कृती. लाल सुकी चटणी कशी बनवायची याबद्दलचा व्हिडिओ foodieklix या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

( हे ही वाचा: अगदी कमी साहित्यात घरच्याघरी बनवा कॅरॅमल सॉस; जाणून घ्या ‘ही’ झटपट रेसिपी)

बेसनाचा चुरा कसा बनवायचा?

  • सर्वप्रथम बेसन आणि पाणी घ्या आणि त्याचे मिश्रण तयार करा.
  • एक कढई घ्या आणि त्यात तेल गरम करा. या तेलात बेसनाचे तयार केलेले मिश्रण हाताच्या मदतीने सोडा.
  • बेसन टाळून झाल्यास त्याचा चुरा बाहेर काढून घ्या.
  • याच तेलात लसूण पाकळ्या सालीसकट घालून तळून घ्या
  • चटणी बनवण्याची कृती
  • एक मिक्सर घ्या आणि त्यात तयार केलेला चुरा घाला.
  • यानंतर त्यात तळून घेतलेल्या लसुणाच्या पाकळ्या घाला.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट घाला.
  • हे सर्व मिश्रण बारीक होईपर्यंत वाटून घ्या.
  • अशाप्रकारे वडापाव सोबत खायची लाल सुकी लसूण चटणी बनवून तयार आहे ही चटणी तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make vadapav special red dry garlic chutney at home know easy recipe gps