तुम्हाला सतत फास्ट फूड आणि दक्षिण भारतीय पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरगुती पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल, आमच्याकडे तुमच्यासाठी एक पदार्थ आहे. तुम्ही वडीचे सांबर करुन तुमची घरगुती पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करू शकता. वडीचे सांबर हा पदार्थ अगदी पटकन तयार होतो आणि तो तयार करण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी आहे. चला तर मग जाणू घेऊ या.
वडीचे सांबर करण्याची रेसिपी
साहित्य –
बेसन – २ वाट्या, कांदे २ बारिक चिरलेले, २ लसून, हिरव्या मिरच्या, आले १ इंच, तिखट २ चमचे, आमसूल २-३, धणे-जिरे पूड १ चमचा, मीठ आणि गूळ चवीप्रमाणे, नारळाचे घट्ट दूध १ वाटी, तळलेला मसाला, ३-३ चमचे, तेल – पाव वाटी, लवंगा २, दालचिनी २ इंच
हेही वाचा : सोया पनीरची स्वादिष्ट भाजी खाऊन पाहा, नॉन-व्हेजची चव विसराल, जाणून घ्या सोपी रेसिपी
कृती –
आले, लसून, मिरची वाटून दोन भाग करा. बेसनामध्ये हळद तिखट, धणे-जिरे पूड, मीठ, आले- लसूण, मिरचीचे अर्धे वाटण घालून नीट एकत्र करा.यात ३ वाटी पाणी टाका आणि नीट एकत्र करा हे मिश्रण गॅसवर ठेवून सतत हलवत राहा. चांगली वाफ आल्यावर त्याचा गोळा तयार होईल. त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करा. एका ताटा तेलाचा हात लावून घ्या. वाटीच्या सपाट भागावर तेल लावून ताटामध्ये गोळा व्यवस्थित थापून घ्या आणि नंतर त्याच्या वड्या पाडा. एका पातेल्यात उरलेल्या पिठात १ वाटी पाणी घालून नीट एकत्र करा.
हेही वाचा : मशिनशिवाय घरीच कसा तयार करावा उसाचा रस, जाणून घ्या सोपा जुगाड
दुसऱ्या पातेल्यात तेल गरम करुन त्यात लवंग आणि दालचिनी टाका. त्यात कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यामध्ये हळद, तिखट, धणे-जिरे पूड आणि आवे लसून मिरचीचे अर्धे वाटण टाकून नीट परतून घ्या. त्यावर पातेल्यातले पाणी टाका. तळलेला मसाला, नारळाचे दूध, आमसूल, मीठ आणि गूळ घालून उकळी आणा. गरज वाटल्यास आणखी थोडे पाणी घाला. त्यात कापलेल्या वड्या घालून एक उकळी आणा. वरूण चिरलेली कोथिंबीर टाका. काही वड्या तळून घ्या. तळलेल्या वड्यांमध्ये अतिशय छान लागतात.