Vegetarian Fish Fry/ Kaccha kelyachi kaap : तुम्ही कधी व्हेजिटेरिअन फिश फ्राय खाऊन पाहिला आहे का? असे जर आम्ही तुम्हाला विचारले तर तुमचा गोंधळ होणे सहाजिक आहे. तुम्हाला वाटेल की, व्हेजेटिरिअन फ्रिश फ्राय हे कसलं नाव? हा पदार्थ नक्की शाकाहारी आहे की मांसाहारी? थांबा थांबा….तुम्हाला आणखी प्रश्न पडण्याआधी आम्ही तुम्हाला या पदार्थाबाबत सांगतो. व्हेजिटेरिअन फिश फ्राय हा पदार्थ शाकाहारीच आहे. कारण तो माश्यांपासून नव्हे तर कच्चा केळ्यापासून तयार केला जातो पण हा पदार्थ दिसायला फिश फ्राय सारखा दिसतो म्हणून त्याला असे नाव देण्यात आले आहे. या पदार्था कच्च्या केळ्याचे काप असे देखील म्हणतात. जसे माशाला मसाला लावून, रव्यात घोळून फ्राय केले जाते त्याच प्रमाणे कच्च्या केळ्याचे काप तयार केले जातात. तुम्हाला नावावरुन हा पदार्थ विचित्र वाटत असला तरी चवीला मात्र हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. कच्च्या केळ्याचे काप हा बनवयला अतिशय सोपा आहे, यास तयार करण्यासाठी काही मिनिटे लागतात. चांगला स्नॅक्सचा पर्याय आहे. तुम्ही हा स्वादिष्ट कच्च्या केळांचे काप खाल्ल्यानंतर तुम्ही फिश फ्राय खाणे विसरू शकता. तुम्ही एकदा नक्की बनवून पाहा. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी
व्हेजिटेरिअन फिश फ्राय /कच्च्या केळ्याचे काप रेसिपी
साहित्य
कच्चे केळी – २
आले लसूण मिरची पेस्ट १ चमचा
हळद -१ अर्धा चमचा
लाल मिरची पावडर २ चमचे
चवीनुसार मीठ
लिंबाचा रस
१/२ कप तांदळाचे पीठ
1/4 कप रवा
तळण्यासाठी तेल
हेही वाचा – काकडीचे धोंडस! नावावर जाऊ नका, फक्त एकदा खाऊन पाहा, मालवण भागातील हटके रेसिपी
कृती:
कच्च्या केळीची साल काढा आणि त्याचे लांबट तुकडे करा. ते धुवा आणि बाजूला ठेवा. आता मसाला तयार करण्यासाठी एक भांड घ्या, त्या आल-लसून- मिरर्ची पेस्ट, हळद, लाल मिर्ची पावडर, मीठ, लिंबाचा रस टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि तयार केलेल्या केळीच्या कापांना व्यवस्थित सर्व बाजून लावून घ्या. आता एका ताटलीत तांदळाचे पीठ आणि रवा घ्या. त्यात मीठ टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता मसाला लावलेले केळीचे काप तांदूळ आणि रव्याच्या पिठात घोळून घ्या. आता गॅसवर तवा तापवायला ठेवून त्यात तेल टाका. तेल तापल्यावर त्यावर रव्यात घोळलेले केळीचे काप फ्राय करून घ्या. लालसर पिवळा रंग येईपर्यंत दोन्ही बाजून भाजून घ्या. तुमचे कच्चा केळीचे काप तयार आहेत. या पदार्थाला व्हेजिटेरिअन फिश फ्राय का म्हटले आहे हे रेसिपी वाचून तुम्हाला कळलेच असेल.