आता लवकरच उन्हाळा सुरू होईल. उन्हाळा म्हटलं की आठवते ती गरमी. या ऋतूमध्ये येणारी अनेक फळे उन्हाळा सुसह्य करण्यास मदत करतात. कलिंगड हे फळ उन्हाळ्यात हमखास पाहायला मिळतं. चवीला मधुर आणि थंड असणारे हे कलिंगड अनेकांच्या आवडीचे असते. कलिंगडाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. कलिंगडाचे गर, बी व साल हे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत. आज आपण कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे सांडगे बनवायला अगदी सोपे आणि २ ते ३ वर्ष आरामात टिकतात. चला तर मग जाणून घेऊया कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचे सांडगे बनवण्याची सोपी रेसिपी..
साहित्य
- कलिंगडाच्या पांढऱ्या गराच्या फोडी
- आलं लसूण कोथिंबीर पेस्ट दोन चमचे
- लाल तिखट एक चमचा
- मीठ चवीप्रमाणे
- हळद अर्धा चमचा
- हिंग अर्धा चमचा
( हे ही वाचा: गोड खावसं वाटतंय? झटपट बनवा ‘खजुराची खीर’)
कृती
- सर्व साहित्य एकत्रित करून कलिंगडाच्या पांढऱ्या घ्या.
- गराच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्या.
- कडक उन्हात दोन ते चार दिवस वाळवा.
- वाळल्यावर तळून खा.
- हे सांडगे दोन ते तीन वर्ष आरामात टिकतात