आजूबाजूच्या परिसरातील छोट्याश्या दुकानापासून ते अगदी मोठ्या-मोठ्या मॉलमध्ये चॉकलेट, कॅडबरी या गोड पदार्थांसाठी एक खास जागा असते. कारण जगातला कुठल्याही वयातील अशी व्यक्ती तुम्हाला शोधून सापडणार नाही ; ज्याला चॉकलेट, कॅडबरी आवडत नसेल. डेअरी मिल्क, किटकॅट, मिल्कीबार, मंच, स्निकर्स आदी विविध कॅडबरी बाजारात सहज उपलब्ध असतात. पण, जर या कॅडबरी तुम्हाला घरी बनवता आल्या तर? आज एका युजरने स्निकर्स घरी कशी बनवायची याची सोपी कृती सांगितली आहे. शुगर फ्री स्निकर्स घरी कशी बनवायची याचे साहित्य आणि कृती लिहून घ्या.

साहित्य –

Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा

सगळ्यात पहिला कॅडबरीचा बेस तयार करण्यासाठी – १/२ कप भाजलेले शेंगदाणे, आठ खजूर, मीठ.

कॅरॅमल बनवण्यासाठी – १/४ कप पीनट बटर, तीन चमचे दूध, तीन चमचे भाजलेले शेंगदाणे, आठ खजूर, मीठ.

चॉकलेट कोटिंगसाठी – १०० ग्रॅम डार्क चॉकलेट, एक चमचा तेल.

हेही वाचा…वाटीभर दूध, चार ब्रेड स्लाइससह १५ मिनिटांत बनवा ‘ब्रेड कस्टर्ड’ ; सोपी कृती, मोजकं साहित्य लिहून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

मिक्सरमध्ये शेंगदाणे घ्या, त्यात खजूर आणि मीठ घालून हे पदार्थ बारीक करून घ्या.
त्यानंतर तयार मिश्रण एका ट्रेमध्ये व्यवस्थित पसरवून घ्या.
नंतर कॅरॅमल बनवून घ्या.
पीनट बटर, तीन चमचे दूध, तीन चमचे भाजलेले शेंगदाणे, आठ खजूर, मीठ मिक्सरच्या भाड्यात आणि बारीक करून घ्या.
तयार केलेल्या मिश्रणाचा ट्रेमध्ये दुसरा बेस बनवून घ्या व वरून सजावटीसाठी शेंगदाणे घाला व थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.
नंतर कॅडबरीप्रमाणे त्याचे तुकडे करून घ्या. कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे चॉकलेट कोटिंग तयार करा. त्यात तयार झालेली कॅडबरी बुडवून घ्या व तीस मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा.
अशाप्रकारे तुमची ‘शुगर फ्री स्निकर्स’ कॅडबरी तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @boldbakingnation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अश्विनी असे या युजरचे नाव आहे. तसेच कॅप्शनमध्ये युजरने अचूक प्रमाण आणि व्हिडीओत शुगर फ्री स्निकर्सरीची कृती सांगितली आहे ; जी अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीस देखील उतरताना दिसत आहे. नेहमी मार्केटमधून विकत चॉकलेट आणण्यापेक्षा तुम्ही अवघ्या काही मिनिटांत घरच्या घरी ही स्निकर्स सहज बनवू शकता. स्निकर्समध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स असतात ; त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही खायला प्रचंड आवडते. तर तुम्ही सुद्धा अगदी मोजक्या साहित्यात ही स्निकर्स बनवून पाहा आणि तुमच्या घरातील लहान मुलानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला द्या.