पावसाळ्यात पावसाचा आनंद घेताना गरमा गरम खावसं वाटतं पण कांदा भजी आणि बटाटा भजी नेहमी नेहमी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही मिश्र डाळींची भजी करु शकता.
डाळींची भजी जितकी टेस्टी असतात तितकीच पौष्टीक असतात. ही भजी कशी बनवायची? जाणून घ्या ही सोपी रेसिपी.

साहित्य

  • मुगाची डाळ
  • हरभऱ्याची डाळ
  • उडीद दाळ
  • हिरव्या मिरच्या
  • आल्याची पेस्ट
  • जिरेपुड
  • धनेपुड
  • मीठ
  • तेल

हेही वाचा : हॉटेलसारखा कुरकुरीत समोसा आता घरीच बनवा, ही सोपी रेसिपी नोट करा

कृती

  • मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि उडीद दाळ सहा-सात तासांसाठी भिजू घाला.
  • सहा-सात तासानंतर या सर्व डाळी मिक्सरमधून बारीक करा.
  • हिरव्या मिरच्यांची बारीक पेस्ट करा.
  • बारीक केलेल्या सर्व डाळीच्या मिश्रणात हिरव्या मिरचीची पेस्ट, आल्याची पेस्ट, धनेपूड, जिरेपूड, मीठ टाका आणि एकत्र मिक्स करा.
  • एका कढईत तेल गरम करा आणि मंद आचेवर गरम तेलात भजी तळा.
  • तुम्ही ही भजी तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.

Story img Loader