हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, यात काही शंका नाही. पण जमिनीत असणारी कंदमुळेही शरीरासाठी तितकीच लाभदायक असतात. सुरण वनस्पतीच्या कंदाचा भाजी म्हणून वापर केला जातो. सुरण कंदमुळाचे सर्वाधिक उत्पादन नायजेरियात होते. तसेच भारत, श्रीलंका, चीन, जावा, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलीपाईन्समध्येही सुरणाच्या वनस्पतींचे मुळ पसरले आहेत. सुरणाच्या भाज्या विशेषत: सुरणाचं भरीत खाणे लोकांना खूप आवडतं. कारण पाण्डुरोग झालेल्या रुग्णांसाठी सुरण खाणे अधिक फायदेशीर ठरु शकतो. उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये उगवणारं हे सुरणाचं कंदमुळ सेवन केल्यास आरोग्यास खूप फायदे होतात. त्यामुळे सुरणाच्या भरीताची झटपट आणि सोपी रेसिपी एकदा समजून घ्या.
नक्की वाचा – खाऊन होणार नाहीत गोल, रोज खा खजुराचे रोल, झटपट आणि सोपी रेसिपी एकदा पाहाच
साहित्य – सुरण, सैंधव चवीनुसार, तीळतेल ४ चमचे, लिंबूरस २ चमचे, आलं पेस्ट अर्धा चमचा.
कृती – सुरणकंदाला मातीचा लेप देऊन गॅसवर भाजावं. थंड झाल्यावर साल आणि माती काढून कालवून मॅश करुन घ्या. त्यात सैंधव, तिळतेल, जिरेपड,लिंबूरस, आलं घालून पुन्हा कालवावं.
उपयोग – पाण्डुरोग दूर होतो. जठराग्नि प्रदिप्त होतो.