Bombil Fry Recipe : नॉनव्हेज खाणारी माणसं चिकन, मटण तर कधी मच्छीवर ताव मारतात. गोड्या पाण्यात अनेक प्रकारचे मासे असतात, ज्यामध्ये बोंबील मासा खाणे अनेकांना आवडतं. कारण बोंबलाची चटणी भाकरी किंवा चपातीसोबत खायला अनेकांना आवडतं. पण काही लोकांना झणझणीत मासे खायला प्रचंड आवडतं. कारण कुरकुरीत तळलेल्या बोंबील फ्रायची डीश समोर दिसली की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.
बोंबील फ्राय करून खाणे काही लोकांना खूपच आवडतं. कारण बोंबील माशाचा रस्सा करण्याऐवजी ते तळून खाल्ल्यानंतर अधिक चविष्ट लागतात, असंही काहिंचं म्हणणं आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत तळलेले बोंबील फ्राय कशे बनवायचे? याची रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी नीट समजून घेतल्यावर तुम्ही तुमच्या घरी झणझणीत बोंबील फ्रायची डीश नक्की बनवू शकता.
नक्की वाचा – आता वडापाव नाही, स्वादिष्ट पॅटीसवर ताव मारा, पॅटीसची सोपी आणि झटपट रेसिपी एकदा वाचाच
साहित्य : ५ ते ६ बोंबिलाचे तुकडे, दीड मोठा चमचा आलं-लसूण-हिरवी मिरची, कोथिंबीर वाटण, एक मोठा चमचा लाल तिखट गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ, २-३ चमचे तेल, रवा ४-५ मोठे चमचे, २ मोठे चमचे मैदा,
कृती – प्रथम एका भांड्यात बोंबिलाचे तुकडे काढून घ्या. त्याला हळद, लाल तिखट-गरम मसाला, हिरवे वाटण आणि चवीप्रमाणे मीठ लावून पाच ते दहा मिनिटे मुरत ठेवा. एका प्लेटमध्ये रवा व मैदा एकत्र करुन घ्या. नंतर एक एक बोंबिलाचा तुकडा त्यात घोळवून घेऊन तव्यावर शॅलोफ्राय करा. कुरकुरीत बोंबील तयार.
(ही कृती बांगडा फ्रायसाठीही वापरू शकता)