Bhakri Recipe : शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सकस आहाराची गरज असते. पण या आहारात भाकरी नसेल तर खाण्याची मजाच निघून जाते. कारण भाकरी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. तुमच्या हृदयाच्या आणि मेंदुच्या कार्याला चालना मिळण्यासही मदत होते. शरीराला आवश्यक असणारे फायबर्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेड भाकरीचं सेवन केल्यानं मिळतात. वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्येत भर पडते. पण भाकरी खाल्ल्याने काही प्रमाणात शारीरिक समस्या कमी होऊ शकतात. यासाठीच आज आम्ही तुम्हाला मऊ भाकरी कशा बनवायच्या याबाबतची सोपी आणि साधी रेसिपी सांगणार आहोत.
साहित्य – अर्धी वाटी पाणी, १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी बाजरीचे पीठ, तेल-तूप,मीठ
कृती- एका पातेल्यात मीठ आणि तेल अर्धा वाटी पाण्यात घालून चांगले उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून भांडे खाली उतरवा. त्यात तांदूळ,बाजरी,ज्वारी यांचे पीठ घालून ती चांगली एकत्र करुन मळून घ्या. परतीत मळतान वाटल्यास थोडे पाणी घ्या व चांगले मळून घ्या. जेणेकरून भाकरी थापताना ती बाजून फाटणार नाही. तवा चांगला तापवून घेतल्यावरच त्यावर भाकरी टाका. भाकरी भाजताना गॅस मोठाच ठेवा.
हे आहेत भाकऱ्यांचे प्रकार
१) ज्वारीच्या पिठाची भाकरी
२) बाजरीच्या पिठाची भाकरी
३) नाचणीच्या पिठाची भाकरी
४) तांदळाच्या पिठाची भाकरी
५) सर्व धान्यांचे पिठ एकत्र करून बनवलेली भाकरी