Coconut Kheer Recipe : नारळाचे पाणी पिण्यासाठी अनेक लोक नारळाच्या झाडावर टक लावून बघतात. कारण नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाहीत. रस्त्यावर नारळाचा स्टॉल दिसला की, नारळाचे पाणी पिण्यासाठी अनेकांच्या रांगा लागतात. पण त्यामुळे नारळाचे अन्य पदार्थ खाणेही सर्वांना आवडतच असणार. अशाच प्रकारचा नारळाचा एक चविष्ट पदार्थ कसा बनवायचा याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नारळाची खीर तुम्हाला माहितच असेल. पण नारळाची चविष्ट खीर कशी बनवायची याबाबत कदाचित तुम्हाला माहिती नसावी. पण आज आम्ही तुम्हाला नारळाची खीर बनवण्याची साधी आणि सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी इतकी सोपी आहे की, काही मिनिटातच तुम्हाला नारळाची खीर बनवता येईल. नारळाची खीर बनवण्यासाठी खाली सांगितलेल्या गोष्टीं फॉलो करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा – आता वडापाव नाही, स्वादिष्ट पॅटीसवर ताव मारा, पॅटीसची सोपी आणि झटपट रेसिपी एकदा वाचाच

साहित्य – नारळ १, साखर १ बाऊल, तूप १ चमचा, रवा आर्धी वाटी, दूध अर्धा लिटर, वेलची चार, काजू व बदाम यांची पूड दोन चमचे

कृती – खोबऱ्याचे बारीक काप करून मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. एका भांड्यात तूप पातळ करुन घ्या. त्यात रवा भाजून लालसर झाल्यावर नारळाचं मिश्रण घाला व त्याचाही रंग लालसर होईपर्यंत परता. साखर घालून ती पातळ होईपर्यंत आणखी काही वेळ परता. दुधातलं अर्ध दूध पटपट ओतत मिश्रण सतत ढवळत राहा. जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. या मिश्रणाला दोन उकळ्या आणि नंतर उरलेलं दूध घाला व पुन्हा उकळी आणा. या मिश्रणात वेलची पूड आणि काजू बदाम पूड घालून ढवळा.

उपयोग – नारळ स्वभावानं शीतल, पित्त, रक्त, वात यांचे विकार कमी करतो. खीर या स्वरुपात वापरली असता शरीराचं बल व वजन वाढवायला मदत होते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to prepare tasty coconut kheer follow this easy recipe for coconut kheer sweet dish loksatta purnabramha latest update nss