How To Reduce The Bitterness of Methi : हिवाळ्यात आपण आवर्जून हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करतो. अशात पालक मेथीची भाजी आवर्जून करतो. अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी खायला आवडते. तुम्हालाही मेथीची भाजी आवडते का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मेथीची भाजी करताना अनेकदा त्यात कडूपणा येतो. अशात ही भाजी कडू लागू नये , याची जास्त काळजी वाटते पण टेन्शन घेऊ नका कारण आज आपण मेथीची भाजी कडू लागू नये, म्हणून खास टिप्स जाणून घेणार आहोत.
यासंदर्भात माहिती सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असेच दोन व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजीला कडूपणा येऊ नये, म्हणून खास टिप्स सांगितल्या आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची मेथीची भाजी कधीही कडू होणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीने या दोन्ही व्हिडीओमध्ये खास टिप्स सांगितल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे खालील टिप्स जाणून घ्या.

  • मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात ओल्या खोबऱ्याचा किस टाकावा.
  • याशिवाय यात शेंगदाण्याचा कुट सुद्धा तुम्ही घालू शकता.
  • मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात एक चमचा वरुन तेल टाका, यामुळे भाजी कडू लागत नाही.

आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये भाजीचा कडूपणा दूर करण्यासाठी टिप्स सांगितल्या आहेत.

  • मेथीची भाजी तोडताना भाजीसाठी फक्त पानांचा वापर करा. शिल्लक राहिलेले देठ फेकून न देता त्याची वेगळी भाजी तुम्ही करू शकता.
  • याशिवाय मेथीची भाजी शिजवताना त्यावर कधीही झाकण ठेवू नये यामुळे कडूपणा येत नाही.

Sahyadri Sugran आणि Dhanashrees Recipe या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून खास टिप्स” Dhanashrees Recipe यांच्या या व्हिडीओवर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या खास टिप्स आवडल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच छान माहिती दिली”

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to reduce the bitterness of methi tips to make bitter free methi know tips to remove bitterness of fenugreek leaves ndj