Potato Uses: स्वयंपाक करणे ही कला आहे असं म्हणतात. एका दिवसात कोणाला ही कला अवगत होत नाही. प्रत्येकालाच उत्तम स्वयंपाक येतो असेही नाही. सतत प्रयत्न करत राहिल्यास हळूहळू आपण उत्तम स्वयंपाक बनवू शकतो पण तोपर्यंत छोट्या मोठ्या चूका होणारच. आपल्यापैकी कित्येकजण स्वयंपाक करताना भात करपवतात किंवा भाजीत जास्त तिखट टाकतात. आपल्यापैकी प्रत्येककडून कधी ना कधी अशी चूक होते. मग भले तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असो किंवा कित्येक वर्षांपासून स्वयंपाक करता असो. कित्येकदा गडबडीमध्ये अशा चूका होतात आणि स्वयंपाकाची चव बिघडते. अशावेळी आता हे खाऊ शकणार नाही असे समजून तुम्ही जेवण फेकून देता का? जर तुम्ही असे करत असाल तर आताच ही सवय सोडून द्याय कारण आम्ही तुम्हाला तुमची बिघडलेला स्वयंपाक सुधारण्यासाठी सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे अन्नही वाया जाणार नाही आणि जेवणाला चव देखील येईल. तुमच्याकडून चुकून स्वयंपाक बिघडला तर तुम्ही अशा वेळी बटाटा वापरू शकता जो जेवणाची चव देखील वाढतो आणि बिघलेला स्वयंपाक सुधारण्यासाठी मदत करतो. काही सोप्या पद्धतीने बटाटा वापरून तुम्ही स्वयंपाक करताना झालेल्या काही चूका सुधारू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.

प्रत्येक पदार्थासोबत वापरला जातो बटाटा

बटाटा आवडत नाही अशी क्वचितच कोणी तुम्हाला सापडेल. तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असो किंवा काहीतरी खास पदार्थ करायचा असेल तर बटाटा असा पदार्थ आहे जो तुम्हाला नेहमी उपयोगी ठरू शकतो. बिघलेल्या जेवणाला सुधारण्यासाठी मदत करतो. बटाटा हा स्टार्च असेलेली भाजी आहे जो ज्या पदार्थामध्ये वापरता त्याची चव स्वत:मध्ये शोषून घेतो. त्यामुळे जेवणाची चव वाढविण्यासाठी बटाटा मदत करतो.

tasty and nutritious palak pare recipe
झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Kaju katli recipe diwali special Kaju katli at Home easy recipe
Kaju Katli Recipe: दिवाळी स्पेशल ‘काजू कतली’ बनवायचीय? मग घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने ट्राय करा रेसिपी
घरी बनवलेली चटणी जास्त दिवस कशी साठवावी?
घरी बनवलेली चटणी जास्त दिवस कशी साठवावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
How To Make Coconut Jaggery Barfi
Coconut Jaggery Barfi : यंदा दिवाळीत बनवा तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी? नक्की ट्राय करा ‘ही’ रेसिपी; अगदी कमी मेहनत लागेल
Potato Guar Chilli Ghewda price increase due to decrease in income
आवक कमी झाल्याने बटाटा, गवार, मिरची, घेवडा महाग
spicy potato thecha
बटाट्याच्या झणझणीत ठेचा नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती

बिघलेला स्वयंपाक सुधारण्यासाठी असा वापरावा बटाटा

डाळ किंवा रस्सा भाजी मीठ जास्त पडल्यास:
मीठ हा असा पदार्थ आहे जो थोडा जास्त किंवा कमी झाला तरी जेवणाची चव बिघडते. मीठ कमी पडले तरी वरुन घेता येते पण जास्त झाले तर पदार्थ खारटं होऊन जातो. स्वयंपाक करता घाई गडबडीत मीठ जास्त पडू शकते अशावेळी तुम्ही बटाटा वापरू शकता जो भाजीतील जास्तीचे मीठ शोषून घेतो. जेवण वाढण्यापूर्वी बटाटा बाजूला काढून ठेवा.

हेही वाचा – Kitchen Hacks: आठवडाभर भाज्या ताज्या ठेवायच्यात? मग वापरून पाहा ‘या’ सहा सोप्या टीप्स

तिखट जास्त झाल्यास :
कित्येक जणांना तिखट खायला आवडते पण काहीजणांनी तिखट सहन होत नाही. तिखट कितीही आवडत असले तरी ठराविक प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास पोट आणि छातीत जळजळ होऊ शकते. कित्येकदाजेवणात तिखट जास्त पडू शकते. अशा वेळी बटाटा उकडा आणि आपल्या पदार्थमध्ये टाका त्यामुळे तिखटपणा कमी होण्यास मदत होईल

हळद जास्त झाल्यास :
आपल्याला स्वयंपाक कितीही चांगला येत असला तरी कधी ना कधी जेवणात चूका होतात. कधी कधी जेवणात हळद जास्त पडते ज्यामुळे जेवण कडू होऊ शकते अशावेळी बटाटा कापून पदार्थमध्ये टाका. बटाटा जास्त झालेली हळद शोषून घेऊ शकतो.

हेही वाचा – एकदा गाजराचं लोणचं खाऊन तर पाहा, मिर्ची-लिंबू-कैरी…बाकी सर्व विसराल! ‘ही’ घ्या रेसिपी

भाजीत पाणी जास्त झाल्यास :
कित्येकजणांना रस्सा भाजी खायलाआवडते तर कित्येक जणांना ग्रे्व्ही असलेली भाजी आवडते. काही पदार्थ ग्रेव्हीसोबतच चांगले लागतात अशा वेळी चूकनही जास्त पडले तरी पदार्थाची चव बिघडते. अशा वेळी तुम्ही उकडून आपल्या पदार्थामध्ये टाका त्यामुळे तुमची ग्रेव्ही घट्ट होईल.

भात करपल्यास :
कित्येकदा आपल्याकडून भात करपतो अशावेळी भाताला करपट चव येते. अशावेळी करपा भात वगळून उरलेला चांगला भात एका वेगळ्या भांड्यात काढा. मधोमध एक कच्चा बटाटा ठेवा आणि १० मिनिटहे झाकून ठेवा. थोड्यावेळाने भाताचा करपा वास भात शोषून घेईल. बटाटा काढून भात खाऊ शकता.

हेही वाचा – Diet tips : तुमच्या यकृताची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल

या सोप्या टीप्स तुम्हाला अन्न वाया जाणे टाळता येते. तुम्हाला अशा टीप्स माहित असेल तर आम्हाला कळवा.