Potato Uses: स्वयंपाक करणे ही कला आहे असं म्हणतात. एका दिवसात कोणाला ही कला अवगत होत नाही. प्रत्येकालाच उत्तम स्वयंपाक येतो असेही नाही. सतत प्रयत्न करत राहिल्यास हळूहळू आपण उत्तम स्वयंपाक बनवू शकतो पण तोपर्यंत छोट्या मोठ्या चूका होणारच. आपल्यापैकी कित्येकजण स्वयंपाक करताना भात करपवतात किंवा भाजीत जास्त तिखट टाकतात. आपल्यापैकी प्रत्येककडून कधी ना कधी अशी चूक होते. मग भले तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असो किंवा कित्येक वर्षांपासून स्वयंपाक करता असो. कित्येकदा गडबडीमध्ये अशा चूका होतात आणि स्वयंपाकाची चव बिघडते. अशावेळी आता हे खाऊ शकणार नाही असे समजून तुम्ही जेवण फेकून देता का? जर तुम्ही असे करत असाल तर आताच ही सवय सोडून द्याय कारण आम्ही तुम्हाला तुमची बिघडलेला स्वयंपाक सुधारण्यासाठी सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे अन्नही वाया जाणार नाही आणि जेवणाला चव देखील येईल. तुमच्याकडून चुकून स्वयंपाक बिघडला तर तुम्ही अशा वेळी बटाटा वापरू शकता जो जेवणाची चव देखील वाढतो आणि बिघलेला स्वयंपाक सुधारण्यासाठी मदत करतो. काही सोप्या पद्धतीने बटाटा वापरून तुम्ही स्वयंपाक करताना झालेल्या काही चूका सुधारू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा