नेहमी घरच्या त्याच-त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी वेगळ्या प्रकारची भाजी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी एकतर तुम्ही हॉटेलमधून काहीतरी वेगळी भाजी ऑर्डर करता किंवा यूट्यूब व्हिडीओ बघून घरी बनवण्याचा प्रयत्न करता. पण, अशाने एकच दिवस तुम्हाला चमचमित भाजी खाल्ल्याचा आनंद मिळतो. पण, आज आम्ही तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही घरच्या घरी करु शकता. आतापर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये खाल्लेली हैद्राबादी मिक्स व्हेज मसाला करी आता घरच्या घरी करा.

हैद्राबादी मिक्स व्हेज मसाला करी साहित्य

traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
as Passenger requested to IndiGo pilot to speak in Hindi
प्रवाशाच्या विनंतीवरून पायलटने केली चक्क हिंदीमध्ये अनाउंसमेंट; नेटकरी म्हणाले, “खूप चांगला प्रयत्न केला” VIDEO VIRAL
Viral video beating of two people in a moving bus video of incident happening in bhopal shocking video
लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार; चालू बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारलं; थरारक VIDEO समोर
nashik video
नाशिकच्या आजोबा एसटी बसमध्ये चक्क छत्री उघडून बसले, Viral Video एकदा पाहाच
Accident News
Video Viral News : चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल २० फूट खाली टँकरवर पडला; अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल
Tiger, Resort, tiger enters in resort, Pench Tiger Reserve, Tourists, Madhya Pradesh, Panic, Forest Department, Wildlife,
Video : वाघाला रिसॉर्टमध्ये आली डुलकी, नंतर आले हत्ती; अखेर…
Natasa Stankovic shares a reflective message expressing gratitude
Natasa Stankovic : हार्दिक-जास्मिनच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान नताशाने शेअर केली इन्स्टा स्टोरी; म्हणाली, ‘योग्य वेळ आल्यावर देव…’

१/२ कप मटार
१ कप फ्लॉवर तुरे
१ कप बटाटे
१/२ कप गाजर
१/२ कप फ्रेंच बीन्स
१ कांदा बारीक चिरून
१/२ कप सिमला मिरची
१/२ कप तोंडली, गिलके
२ मध्यम टोमॅटो
१०० ग्रॅम पनीर
१/२ कप पालक पेस्ट करून

मसाला / ग्रेव्ही / करी:-

२ कांदे उभे चिरुन
७ ते ८ लसुण पाकळ्या
१/४ कप खोबरं किस
१ इंच आले
४ ते ५ हिरव्या मिरच्या
१/२ कप कोथिंबीर + कोथिंबीर देठ
१/८ कप पुदिना पाने
१ टीस्पून धणे
१/४ टीस्पून जीरे
१-१/२ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
१/२ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून हळद
तेल आवश्यक ते नुसार

खडे मसाले:-

२ ते ३ लवंगा
२ ते ३ मीरे
१ इंच दालचिनी
२ हिरवी वेलची
२ तमालपत्र
गरम पाणी गरजेनुसार
मीठ चवीनुसार

हैद्राबादी मिक्स व्हेज मसाला करी रेसिपी

१. प्रथम भाज्या चिरुन घ्या. मटार सोलून घ्या. फ्लॉवरचे मोठे तुरे मोडून घ्या. फ्रेंच बीन्स, गाजर, सिमला मिरचीचे एक इंचाचे तुकडे करून घ्यावे. कांदा उभा आणि बारीक दोन्ही चिरून घ्या. टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

२. कढई तापत ठेवा. त्यात थोडेसे तेल घाला. खडे मसाले (लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी वेलची, तमालपत्र) त्यात छान भाजून घ्या. व बाजूला डिशमध्ये ठेवा गार झाल्यावर खडे मसाले ह्याची मिक्सर मध्ये फिरवून बारीक पूड करून घ्या.

३. त्याच कढईत तेल घाला. उभा चिरून घेतलेला कांदा, लसूण, आले, खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कोथिंबीर देठ, पुदिना, धणे, जीरे, सगळे खरपूस भाजून घ्या. नंतर गार झाल्यावर मिक्सर मध्ये फिरवून बारीक वाटून घ्या.

४. आता कढईत तेल घाला ते तापवून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. तो पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो घाला. तो छान मऊ होईपर्यंत परतून घ्या. हळद घाला. आता त्यात वाटून घेतलेला मसाला आणि खडा मसाला पूड घालून घ्या. आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात लाल तिखट घालून घ्यावे.

हेही वाचा >> विदर्भ स्पेशल आमरस; इन्स्टंट आमरसाची पाहा सोपी रेसिपी; ५ मिनिटात पातेलंभर रस

५. आता एक एक करून भाज्या घालून घ्या. मटार, सिमला मिरची, फ्रेंच बीन्स, गाजर, फ्लॉवर तुरे घालून मिक्स करावे, पालक पेस्ट घालावी. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या. झाकण ठेवून वाफ आणावी. आता त्यात गरम पाणी घालून घ्या. झाकण ठेवून छान शिजवून घ्या. शेवटी गरम मसाला घालून एकजीव करून घ्यावी.