के नायडू

साहित्य

पाऊण कप गरम पाणी, अर्धा कप साखर, पाव कप कोको पावडर, १ चमचा चॉकलेट सिरप, १कप दूध, २ कप बर्फ, पाव कप क्लब सोडा, ४ स्कूप चॉकलेट आईसक्रीम, पुदिन्याची पाने

कृती

गरम पाण्यामध्ये साखर, कोको पावडर आणि चॉकलेट सिरप मिसळून घ्या. त्यात दूध घालून गार करायला ठेवून द्या. या मिश्रणात बर्फ घाला आणि मिश्रण चांगले घोटून घ्या. ग्लासाच्या तळाशी क्लब सोडा ओता. त्यानंतर त्यात चॉकलेटचे मिश्रण ओता. आता यावर आईस्क्रीमचा स्कूप ठेवा आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा.

Story img Loader