How to Buy Seedless Brinjal : स्वयंपाक करणे ही एक कला आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण तुम्हाला हे माहित आहेत का स्वयंपाक करण्या इतकीच त्यासाठी लागणारी तयारी करणे आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थ योग्य पद्धतीने ओळखणे ही देखील एक कला आहे. जर तुम्ही एखादी भाजी तयार करत आहात तर त्यासाठी तुमची भाजी ताजी असणे गरजेचे आहे ज्यामुळे स्वयंपाकाची चव आणखी चांगला होऊ शकतो. स्वयंपाक चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये टाकले जाणारे मसाला आणि भाज्या सर्व काही गरजेचे असते. आज आपण अशा भाजीबाबत जाणून घेणार आहोत जी तयार करण्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने खरेदी करणे आले पाहिजे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही वांग्याबद्दल बोलत आहोत. जर तुम्ही भरलेली वांगी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ते विकत घेण्याची योग्य पद्धत देखील माहित असणे आवश्यक आहे. जास्त बिया असलेल्या वांग्यांपासून भरलेले वांगे चांगले तयार होत नाहीत. यासाठी बिया नसलेली वांगीच चांगली मानली जातात. पण ते कापल्याशिवाय शोधणे अशक्य वाटते. पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वांग्यात बिया आहेत की नाही हे जाणून घेऊ शकता.

भाजीसाठी असे निवडा चांगले वांगे

हलक्या वजनाची वांगी घ्या

वांग्याच्या वजनावरून त्यात बिया आहेत की नाही हे देखील कळू शकते. जर वांगी खूप जड असेल तर समजून घ्या की, त्यात भरपूर बिया आहेत. म्हणूनच तुम्ही वांगी उचलून पहा, जर वांगी हलकी असेल तर समजून घ्या की त्यात बिया कमी आहेत आणि ते भरलेल्या वांग्यासाठी अगदी योग्य आहे.

हेही वाचा : सोया पनीरची स्वादिष्ट भाजी खाऊन पाहा, नॉन-व्हेजची चव विसराल, जाणून घ्या सोपी रेसिपी

कडक वांगी

वांगी घेताना लक्षात ठेवा की त्याचा रंग विचित्र नसावा तसेच तो कडक असावा. ताजी वांगी कडक असतात, जास्त वेळ ठेवली तर मऊ होते.

हेही वाचा : भेंडी चिकट होतेय? अशी बनवा कुरकुरीत भाजी, ‘या’ ५ सोप्या पद्धती वापरून पाहा

छिद्रे नसलेली वांगी

वांगी घेण्यापूर्वी ती सर्व बाजूंनी नीट तपासून घ्यावी. जर त्यात छिद्र असेल तर त्यात अळी असू शकते. म्हणूनच वांगी हा प्रकार अजिबात घेऊ नका.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Identify if eggplant has seeds or not without cutting how to buy seedless brinjal know very easy method snk
Show comments