Viral Video : इडली हा असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. अनेकदा इडली खायची इच्छा होते पण पीठ भिजवले नसल्यामुळे आपण इडली बनवू शकत नाही पण आम्ही जर तु्म्हाला सांगितले की एकदा इडलीचे पीठ बनवा आणि चार महिने त्या महिन्यापासून इडली बनवा, तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय. एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चार महिने वापरता येईल असे इडलीचे पीठ कसे बनवायचे, याविषयी सांगितले आहेत. (Idli batter recipe Prepare Idli batter once and eat idli whenever you want for four months)

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

साहित्य

  • दोन कप तांदूळ
  • एक कप उडदाची डाळ
  • अर्धा कप पोहे
  • एक चमचा मेथीचे दाणे

हेही वाचा : Sweet Corn Dhokla: एक कप रवा, दही घालून करा ‘मक्याचा ढोकळा’; फक्त १५ मिनिटांत होईल तयार; रेसिपी लिहून घ्या

पाहा व्हायरल व्हिडीओ

कृती

  • डाळ आणि तांदूळ सुरुवातीला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर चाळणीवर घालून निथळून घ्यायची.
  • त्यानंतर एका सुती कपड्यावर घरातच पंख्याखाली वाळवायची
  • वाळल्यानंतर एका कढईत तांदूळ हलके भाजून घ्या.
  • उडदाची डाळ याचप्रमाणे मंद गॅसवर भाजून घ्या.
  • पोहे सुद्धा भाजून घ्या.
  • त्यानंतर तांदूळ, पोहे आणि डाळ एकत्रित करावीत.
  • त्यात मेथीचे दाणे टाकून एका मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण बारीक करावे.
  • हे पीठ कोरड्या डब्यात भरून ठेवावे.
  • हे पीठ तीन ते चार महिने आरामात टिकते आणि या पासून तुम्ही कधीही झटपट इडली बनवू शकता.

हेही वाचा : Monsoon Special Recipe: पावसाळ्यात काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते? तर कांदा, ब्रेडसह बनवा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ; रेसिपी लगेच नोट करा

ही भन्नाट ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. जर तुमच्या घरी कोणालाही इडली आवडत असेल तर तुम्ही या पिठापासून झटपट इडली बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

vaishalisrecipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इडलीसाठी एकदाच असे पीठ बनवून, चार महिने ठेवा व वाटेल तेव्हा इडली बनवून खा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान ट्रिक आहे” तर एका युजरने लिहिलेय, “इडलीप्रमाणे ढोकळ्याचे पण पीठ सांगा कसे बनवायचे?”