Idli sambar recipe in marathi: इडली हे साऊथ इंडियन फूड असलं तरीही जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात आवडीने खाल्ल जातं. चवीने आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असण्यासोबतच, इडली ही एक रेसिपी आहे जी कमी वेळात झटपट तयार करता येते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट इडली कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही इडली चवीला अप्रतिम आणि हेल्दी असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल, तर तुम्ही चिंता न करता तुमच्या नाश्त्यामध्ये या इडलीचा समावेश करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • ५०० ग्रॅम इडलीचे पिठ
  • १०० ग्रॅम मिक्स भाज्या(शेंगा, वांगे, टोमॅटो, कांदे)
  • ७० ग्रॅम मिक्स डाळ(तुरडाळ, मुगडाळ, मसुरडाळ)+ १ टिस्पून मेथी दाणे
  • 1/2 टिस्पून हळद
  • 1-2 टिस्पून तिखट
  • 1-2 टेबलस्पून सांबार मसाला
  • 2-3 लाल सुक्या मिरच्या
  • 1 टिस्पून मोहरी
  • 1 टिस्पून जीरे
  • 6-7 कडिपत्याची पाने
  • 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ
  • 1 टेबलस्पून गुळ पावडर
  • 1-2 टेबलस्पून कोथिंबिर
  • तुकडे चटणीचे साहित्य ४० ग्रॅम ओल्या खोबर्‍याचे
  • २० ग्रॅम डाळ
  • 2 लाल मिरच्या
  • 1 आल्याचा तुकडा
  • 2 लसुण पाकळ्या
  • 1 टिस्पून साखर
  • 1 टिस्पून चिंचेचा कोळ
  • 2 टेबलस्पून कोथिंबीर
  • चविनुसार मीठ
  • 1-2 टेबलस्पून तेल
  • 1 टिस्पून धणे पावडर
  • 1-2 पिंच हिंग

कृती

प्रथम मिक्स डाळी मेथीदाणे २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. सर्व भाज्या कापून ठेवा आणि कांदे उभे चिरून ठेवा.

चटणीचे सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये टाकून आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून चटणी वाटून ठेवा.

कुकरमध्ये मिक्स डाळी, हळद, कांदा, टोमॅटो मिक्स करून पाणी टाकून २-३ शिट्टया करून शिजवून घ्या.

डाळीचा कुकर उघडून त्यात भाज्या मिक्स करून परत थोडावेळ १ शिट्टी करून घ्या.

कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हिंग हळद, कडिपत्ता, लाल मिरच्या, उभा कांदा, टोमॅटो, लाल तिखट, सांबार मसाला, कोथिंबिर, धणे पावडर मिक्स करा.

नंतर त्यात शिजवलेली मिक्स डाळ व भाज्या मिक्स करा. आवश्यकतेनुसार गरम पाणी चिंचेचा कोळ, गुड पावडर, मीठ मिक्स करा व ५-७ मिनिटे शिजवा.

इडली स्टँडला तेल लावून इडली बॅटर भरा व १०-१२ मिनिटे स्टीम करा.

गरमागरम सांबार, वाफळत्या मऊ लुसलुशित इडल्या कोथिंबीर शिवरून चटणीबरोबर ही डिश सर्व्ह करा.

नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.