अनेकांना दुध किंवा दूधपासून तयार केलेले पदार्थ आवडत नाहीत. पण, पनीर मात्र याला अपवाद आहे. पनीर हा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. भाजी असो किंवा सॅलड त्यामध्ये पनीर घातलं की, पदार्थाची चव आपसूकच वाढते. तुम्ही आतापर्यंत पनीर पासून बनवलेले पनीरची भाजी, पालक पनीर, पनीर मसाला, पनीर पकोडे, पनीर चीज बॉल्स, पनीर क्रिस्पी आदी अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण, आज आपण एक नवीन पदार्थ शिकणार आहोत. आज आपण पालक, पनीर पॉकेट ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहुयात या पदार्थांची सोपी रेसिपी.
साहित्य –
पनीर पॉकेट बनवण्यासाठी लागणार साहित्य –
१) एक कप संपूर्ण गव्हाचे पीठ
२) एक कप मैदा (मैदा)
३) एक चमचा तेल
४) चवीनुसार मीठ
स्टफिंगसाठी –
१) १ ३/४ कप किसलेला पनीर
२) १/२ कप चिरलेला पालक
३) १/२ कप मॉझरेला चीज
४)१/४ कप बारीक चिरलेला कांदा
५)१ १/२ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
६) दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
७) १/४ चमचा गरम मसाला
८) एक चमचा चाट मसाला
पनीर पॉकेट बनवण्यासाठी साहित्य –
१) दोन चमचे मैदा
२) ३ १/२ चमचे बटर
व्हिडीओ नक्की बघा…
कृती –
१) एका बाउलमध्ये किसलेलं पनीर घ्या.
२) त्यात पालक, चीज आणि बारीक कापून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, काळी मिरी पावडर, गरम मसाला, चाट मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
३) त्यानंतर गव्हाचे पीठ आणि मैद्याच्या पिठ मळून त्याची एक मोठी पोळी लाटून घ्या.
४) त्यानंतर तयार करून घेतलेलं मिश्रण लाटलेल्या पोळीत मधोमध घाला.
५) दोन्ही बाजूने पोळी व्यवस्थित पाकिटासारखी दिसेल अशी घडी घालून घ्या बंद करून घ्या.
६) त्यानंतर या पनीरच्या तयार केलेल्या पॉकेटला तव्यावर बटर घालून भाजून घ्या.
७) अशाप्रकारे तुमचं पनीर पॉकेट तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @tarladalal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने ४५ मिनिटांत झटपट होणारी रेसिपी व्हिडीओत दाखवली आहे ; जी तुम्ही घरी सहज बनवू शकता. आपल्याला पनीरचे बाहेर बनवलेले बरेच पदार्थ आवडतात. पण, हेच पदार्थ आपण घरी बनवले तर… तुमचे आरोग्यही उत्तम राहिले आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तुम्ही बनवलेल्या पौष्टीक पदार्थांचा आस्वाद घेतील.
© IE Online Media Services (P) Ltd