जर तुम्हालाही चिकन खायला आवडत असेल आणि तुम्ही अनेकवेळा अनेक प्रकारच्या चिकन डिशेस घरी तयार करून पाहुण्यांना दिल्या असतील तर यावेळी चमचमीत स्टफ्ड चिकन पेपर्स रेसिपी ट्राय करा. चिकनच्या त्याच त्याच रेसिपी खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, चला तर पाहुयात कसे बनवायचे चमचमीत स्टफ्ड चिकन पेपर्स..
स्टफ्ड चिकन पेपर्स साहित्य :
- अर्धा किलो चिकन खिमा, ४ मोठय़ा लाल सिमला मिरच्या
- २ चमचे तेल, १ चमचाभर वाटलेलाली लसूण
- पाव चमचा चिली फ्लेक्स
- २ चमचे चिरलेला पुदिना
- १ कप किसलेले मोझेरेला चीझ
- १ चमचा गरम मसाला, मीठ
स्टफ्ड चिकन पेपर्स कृती :
- सगळ्यात आधी चिकन खिमा व्यवस्थित धुऊन घ्यावा. हळद, मीठ, वाटलाली लसूण, गरम मसाला याचे मिश्रण चिकनला लावून ते मुरण्यासाठी ठेवावे.
- दुसरीकडे लाल मिरची घेऊन त्यातला वरील भाग चिरून आतील बिया काढून ती पोकळ करून घ्यावी. मसाल्यात मुरवलेला खिमा या मिरच्यांमध्ये भरावा.
- आता कढईत तेल गरम करून त्यावर खिमा भरलेल्या सिमला मिरच्या परताव्यात. थोडे पाणी घालून वाफवून घ्यावे आणि गॅसवरून खाली उतरावे.
हेही वाचा – मोरोक्कन लेमन चिकन; एकदा खाल तर खातच रहाल! ही घ्या रेसिपी
शेवटी त्यावर किसलेले चीझ, चिली फ्लेक्स आणि पुदिना घालून सव्र्ह करावे.