Instant Idli Recipe Video : सोशल मीडियावर रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रेसिपीचे व्हिडीओ खूप हटके असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इस्टंट रवा इडली कशी बनवायची, याविषयी सांगितले आहे. इडली खरं तर साउथ इंडियन पदार्थ आहे पण संपूर्ण भारतात मोठ्या आवडीने खाल्ला जातो.
नाश्त्यात इडली असेल तर नाश्ता पोटभरून खावासा वाटतो पण इडली बनवण्यासाठी एक दिवसाआधी पासून तयारी करावी लागते. अशावेळी इस्टंट इडली फायदेशीर ठरते. ती बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होते. (Instant Idli Recipe how to make Instant Idli make it only 10 minutes watch viral video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये इस्टंट रवा इडलीची रेसिपी दाखवली आहे. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे – (Instant Idli Recipe )
साहित्य
पोहे
जाडा रवा
दही
पाणी
तेल
कृती
सुरुवातीला एक वाटी पोहे मिक्सरमध्ये बारीक करा. बारीक केलेले पोहे आणि दिड वाटी जाडा रवा एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ घाला. त्यात अर्धा वाटी दही टाका. त्यानंतर ३ वाटी पाणी टाका. सर्व मिश्रण एकत्र करा आणि १५ मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा. त्यानंतर त्यात इनो टाका आणि पुन्हा मिश्रण एकजीव करा. इडली पात्रातील प्लेट्सवर तेल लावा. त्यात थोडे घटट्सर असे हे मिश्रण प्लेट्सवर टाका. त्यानंतर इडली पात्रातील इडली दहा मिनिटे शिजू द्या. इडली शिजल्यानंतर तुम्ही ही इडली कोणत्याही आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
food.katta.marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या अकाउंटवरून असे अनेक रेसिपीचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी लाइक्स आणि कमेंट्स केले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक रेसिपीचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ इतके व्हायरल होतात की पुढे चांगलेच लोकप्रिय होतात. भन्नाट रेसिपीचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात.