शुभा प्रभू-साटम
साहित्य – साधारण पिकलेलं केळं, तूप, बदाम, काजू, मनुका, थोडी साखर, दालचिनी पावडर.
आणखी वाचा
कृती – साधारण पिकलेलं केळं घ्या. त्याचे जाडसर गोल गोल काप काढा. आता एका पसरट भांडय़ात तूप तापवून त्यात हे काप लालसर होईपर्यंत भाजून घ्या. यावर बदाम, काजूचे तुकडे करून घाला. थोडी साखर आणि जराशी दालचिनी पावडर मिक्सरमधून रवाळ करून ती यावर भुरभुरू शकता. तुम्ही यासाठी कोक पावडरही वापरू शकता. शिवाय या कापांबरोबर मध किंवा मेपल सिरपही देता येईल. केळ्याचंच नव्हे तर सफरचंदाचंही तुम्ही असंच काप करू शकता.