Chili Garlic Paratha Recipes: अनेकदा नाश्त्यामध्ये आपण बटाट्याचा पराठा, पनीर पराठा बनवतोच पण, सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही हेल्दी आणि टेस्टी चिली गार्लिक पराठा नक्कीच ट्राय करू शकता. चला तर जाणून घेऊया साहित्य आणि कृती…
चिली गार्लिक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: (Chili Garlic Paratha)
- १ कप गव्हाचे पीठ
- हिरवी धणे १ टीस्पून
- २ चमचे बारीक चिरलेला लसूण
- ३-४ हिरव्या मिरच्या
- २-३ लाल मिरच्या
- १ चीज क्यूब
- तेल आवश्यकतेनुसार
- चवीनुसार मीठ
हेही वाचा: फक्त १५ मिनिटांत असे बनवा व्हेजिटेबल मेयो सॅलड; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
चिली गार्लिक पराठा बनवण्याची कृती:
- चिली गार्लिक पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका खोलगट भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल, पाणी घालून मिक्स करून कणीक मळून घ्या.
- आता मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरवी आणि लाल मिरची, कोथिंबीर घालून बारीक करुन घ्या.
- आता मळलेल्या पीठाचे गोळे करा आणि एक गोळा लाटून त्यावर चिली गार्लिक पेस्ट लावून घ्या.
- आता त्यावर किसलेले चीज टाकून गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्या, त्यावर तेलही लावा.
- तयार चविष्ट चिली गार्लिक पराठ्याचा आस्वाद घ्या.