Rava Vada Recipe: रव्यापासून शिरा, उपमा, डोसा, असे नाश्त्याचे विविध पदार्थ बनवले जातात. पण, आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि चविष्टदेखील आहे. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपीचे साहित्य आणि कृती…

रवा वडे बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

  • १ वाटी रवा
  • २-३ बारीक चिरलेल्या मिरच्या
  • ७-८ कढीपत्त्याची पाने
  • ३ चमचे चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

रवा वडे बनविण्याची कृती:

हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत झटपट बनवा तांदळाचे मेदूवडे; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

  • सर्वप्रथम गॅसवरील गरम कढईत दीड ग्लास पाणी घाला. त्यानंतर त्यात चिरलेल्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, मीठ घालून शेवटी रवा घाला.
  • हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून, त्यावर दोन मिनिटे झाकण ठेवा.
  • ठरावीक वेळेनंतर झाकण काढून, पुन्हा हे मिश्रण परतून घ्या.
  • आता गॅस बंद करून, मिश्रण एका ताटात काढा आणि त्याचे गोल गोल वडे बनवून, ते गरम तेलात तळून घ्या.
  • सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळल्यानंतर ते काढून घ्या आणि सॉसबरोबर सर्व्ह करा.